बंगळूरू : ऱेस्टॉरंटमध्ये आग, ५ जणांचा होरपळून मृत्यू

कर्नाटकची राजधानी बंगळूरुच्या एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याने ५ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 8, 2018, 10:51 AM IST
बंगळूरू : ऱेस्टॉरंटमध्ये आग, ५ जणांचा होरपळून मृत्यू title=

बंगळूरु : कर्नाटकची राजधानी बंगळूरुच्या एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याने ५ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, केआर मार्केटमधील कैलाश बार रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी रेस्टॉरंटचे ५ कर्मचारी आत झोपले होते. यावेळी या पाचही जणांचा मृत्यू झाला. या बारचे लायसन्स आरव्ही दयाशंकर या व्यक्तीच्या नावावर आहे. 

स्थानिक लोकांनी या रेस्टॉरंटमधून धूर निघत असताना पाहून अग्निशमन दलाला फोन केला. आगीची खबर मिळताच पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटली असून स्वामी (23), प्रसाद (20), महेश, हासन निवासी मंजुनाथ (45) आणि मांड्या निवासी कीर्ति (24) अशी त्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कलसीपल्यामधील कुभांरा संघ भवनच्या खालच्या मजल्यावरील स्थित कैलाश बार आणि रेस्टॉरंटमध्ये घडली. काही लोकांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रेस्टॉरंटमधून आगीचे लोळ तसेच धूर येताना पाहिला आणि तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला. 

रेस्टॉरंटमध्ये ही आग कशामुळे लागली याबाबतचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. याबाबतचा तपास सुरु आहे.

मुंबईत आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू

याआधीही मुंबईतील कमला मिल परिसरात लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर १९ जण जखमी झाले.