मुंबई : 1 जूनपासून देशात बरेच नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. त्यामुऴे या बदललेल्या नियमांची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला या सर्व बदललेल्या नियमांची माहिती देणार आहोत.
बँक ऑफ बडोदा 1 जूनपासून सेंट्रलाइझ पॉजिटिव पे सिस्टम लागू करणार आहे. 2 लाखापेक्षा अधिक किंमतीच्या चेकसाठी हा नियम लागू असणार आहे. या नियमांतर्गत आपण बँकेला आधीच या बद्दलची कल्पना देऊ शकतो. किंवा चेक क्लियर करण्यापूर्वी बँक ग्राहकांकडून याबद्दलचं कन्फर्मेशन घेईल. ग्राहकाच्या कन्फर्मेशन शिवाय चेक पुढे जाणार नाही. बँकिंग घोटाळा थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तुम्हा या बद्दलच्या अधिक माहितीसाठी 18002584455 / 18001024455 टोल फ्री क्रमांकावर कॉल करु शकता.
1 जूनपासून टॅक्सपेयर्स संदर्भात देखील मोठा बदल होणार आहे. टॅक्सपेयर्सची सोय लक्षात घेऊन सरकार इनकम टॅक्सची वेबसाईट बदलत आहे. यामुळे इनकम टॅक्सचीची सध्याची वेबसाइट १ ते 6 जून दरम्यान काम करणार नाही आणि 7 जून रोजीपासून पुन्हा वेबसाईट सुरू केली जाईल. ही नवान वेबसाईट यूझर्ससाठी पहिल्यापेक्षा आधिक अनुकूल असणार आहे. सध्याच्या इनकम टॅक्सची वेबसाईट ही URL (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) आहे. तर नवीन वेबसाइटची URL (www.incometaxindiaefiling.gov.in) असणार आहे.
1 जून 2021 पासून, Google स्टोरेजसंदर्भातील नियमही बदलणार आहेत. Google Photo आता पूर्वीसारखा राहणार नाही. यामध्ये तुम्हा तुमचे सर्व फोटो आणि व्हीडिओ Google अॅपमध्ये सेव्ह करु शकणार नाही. Google Photos मध्ये यूझर्स विना मुल्य आपले हाय क्वालीटी फोटो आणि व्हीडिओ सेव्ह करुन ठेऊ शकत होते. परंतु मागच्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये Google ने घोषित केले आहे की, कंपनी 1 जून 2021 पासून Google फोटोवर हाय क्वालीटीच्या फोटों आणि व्हीडिओसाठी अमर्यादित विनामूल्य ऑफर लागू रहाणार नाही.
जर तुम्ही 1 जून 2021 नंतर मेमरी संपविली तर, तुम्ही जोपर्यंत Google वरून अतिरिक्त मेमरी खरेदी करत नाही, तोपर्यंत तुमचा फोटो किंवा व्हिडिओंचा बॅक अप घेऊ शकत नाही किंवा मग यासाठी तुम्हाला Gmail, Google Photos किंवा Google डिस्कच्या कॅपॅसीटीला 15 जीबीपेक्षा कमी करावे लागेल.
याशिवाय एलपीजी गॅसची किंमत बदलण्याची शक्य देखील वर्तवली जात आहे. सहसा, महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसची किंमत बदलते, परंतु कोरोना कालावधीत त्याची किंमत महिन्याच्या मध्यात किंवा शेवटी कमी किंवा वाढविली जाते. मे महिन्यामध्ये लपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी एप्रिलमध्ये किंमतीत 10 रुपयांची कपात केली होती. मार्चमध्ये 25 रुपयांची वाढ झाली. सध्या अनुदानित एलपीजी गॅसची किंमत दिल्लीत 809 रुपये, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईमध्ये 825 रुपये आहे.
1 जूनपासून अनेक राज्यात अनलॉकिंग प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि कोरोनाच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. या व्यतिरिक्त मान्सून 1 जूनला केरळमध्ये हजेरी लाऊ शकतो. हा मान्सून शेतकऱ्यासाठी चांगला असल्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. खासगी संस्था स्केगमेंटने यंदा 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे.