मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. याचा सर्वाधिक फटका इटलीनंतर आता अमेरिकेला बसत आहे. भारतात कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात असल्याने येणारे काही दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांनी देखील यात सहकार्य करण्याची अधिक गरज आहे. कारण जगभरात कोरोना आपले पाय पसरवत आहे.
इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर आता अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 345 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर येथे 18000 नवीन रुग्ण आढशून आले आहेत. अमेरिकेत दर मिनिटाला १३ कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १ लाखावर गेली आहे. अमेरिकेने चीन, इटली आणि स्पेनला मागे टाकले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या 834 वर गेली आहे. याआधी शुक्रवारी संसर्ग झालेल्यांची संख्या 724 होती. म्हणजेच एका दिवसात 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
आज संपूर्ण जगाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगातील श्रीमंत देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे आणि मृत्यूची संख्या दररोज वाढत आहे. या सर्वांमध्ये, वैज्ञानिकांनी जगाला काहीसा दिलासा दिला आहे. एका अभ्यासामध्ये असे समोर आले आहे की उष्णता वाढल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकतो. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना विषाणूमुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लोकांना महत्वाच्या गोष्टींबरोबर संघर्ष करावा लागतो. जनतेच्या या समस्येवर मात करण्यासाठी नोएडा प्राधिकरणाने होम डिलीव्हरी सेवा सुरू केली आहे. ही सेवा २८ मार्चपासून म्हणजेच आजपासून सुरू होईल. नोएडा अथॉरिटीच्या सीईओनी म्हटलं की, आवश्यक वस्तूंच्या डोर टू डोर डिलिव्हरीसाठी 1500 डिलिव्हरी बॉय असतील.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकं घरात असले तरी दुसरीकडे मोदी सरकार सर्व राज्य सरकारांसह कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी काम करते आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारच्या विविध मंत्रालयांचे मंत्री आणि सचिवांसोबत पंतप्रधान मोदी थेट अहवाल घेत आहेत. पंतप्रधान मोदी अहवाल आल्यानंतर रणनीती आणण्याचं काम करत आहेत.