कर्नाटकात काँग्रेस विजयी झाली तर हे 5 फायदे आणि पराभूत झाली तर 5 तोटे

पाहा कसं असेल काँग्रेसचं पुढचं भवितव्य

शैलेश मुसळे | Updated: May 14, 2018, 07:36 PM IST
कर्नाटकात काँग्रेस विजयी झाली तर हे 5 फायदे आणि पराभूत झाली तर 5 तोटे title=

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत 222 जागांसाठी मतदान पार पडलं. 15 मेला निवडणुकीचा निकाला लागणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस जर आपली सत्ता काय ठेवते तर भविष्यात याचे 5 मोठे फायदे होणार आहेत पण काँग्रेसला जर बहुमत नाही मिळालं तर येणाऱ्या काळात काँग्रेसला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शक्यतो जाणून घेऊया.

काँग्रेस विजयी झाली तर...

1.राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर हा काँग्रेसचा पहिला विजय असेल. नेतृत्व परिवर्तनाचा हा शुभ संकेत मानला जाईल. पक्षात राहुल गांधी यांची पकड वाढेल.

2.विरोधी पक्षांमध्ये जे नेते राहुल यांच्या नेतृत्वाला विरोध करतात त्यांना देखील राहुल गांधींचं नेतृत्व मान्य करावं लागेल.

3.राहुल गांधी या विजयानंतर त्यांना हवे तसे बदल पक्षात करु शकतील आणि ते पक्षातील सर्व नेते मान्य करतील.

4.कर्नाटक सारख्या आर्थिक रूपाने संपन्न राज्यात सरकार कायम ठेवणं ही 2019 च्या निवडणुकीत पक्षाला फंड उपलब्ध करण्यास मदत करेल.

5.सिद्धरमैया राष्ट्रीय स्तरार काँग्रेसच्या मागासलेल्या वर्गाचे नेता म्हणून पुढे येतील.

जर काँग्रेस पराभूत झाली तर...

1.पक्ष आपल्या सर्वात वाईट काळात पोहोचेल. पुन्हा उभं राहणं पक्षाला कठीण होऊन जाईल.

2.मागील काही वर्षांमध्ये उपनिवडणुकीत मिळालेल विजय आणि गुजरातमध्ये भाजपला दिलेली टक्कर यामुळे वाढलेलं मनोबल पुन्हा एकदा कमी होऊन जाईल.

3.2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याच्या शक्यात आणखी कमी होऊन जातील.

4.राज्यांमधील छोट्या छोट्या पक्षांमध्ये देखील काँग्रेसची किंमत कमी होऊन जाईल.

5.पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्या कामात हस्तक्षेप करु लागतील. राज्यामधील असंतुष्ट काँग्रेस नेते पक्ष सोडून जातील.