प्रत्येक कर्मचाऱ्याला माहित असावे हे PF अकाऊंटशी संबधीत 5 फायदे; जाणून घ्या सविस्तर

EPFO Account Benefits : गेल्या काही वर्षांत व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. तरीही, नोकरदारांसाठी EPF एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. सध्या पीएफवरील व्याजदर 8.50 टक्के आहे. प्रत्येक खातेदाराच्या पगारातून 12 टक्के पीएफ कापला जातो. पण, पीएफमध्ये गुंतवणुकीशिवाय इतरही अनेक फायदे आहेत.

Updated: Jan 12, 2022, 10:16 AM IST
प्रत्येक कर्मचाऱ्याला माहित असावे हे PF अकाऊंटशी संबधीत 5 फायदे; जाणून घ्या सविस्तर title=

नवी दिल्ली: EPFO Account Benefits: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) भविष्यासाठी बचतीचा एक चांगला पर्याय मानला जातो. केंद्र सरकार दरवर्षी व्याजदर निश्चित करते. गेल्या काही वर्षांत व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. तरीही, नोकरदारांसाठी हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. सध्या पीएफवरील व्याजदर 8.50 टक्के आहे. प्रत्येक खातेदाराच्या पगारातून 12 टक्के पीएफ कापला जातो. पण, पीएफमध्ये गुंतवणुकीशिवाय इतरही अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया?

1. PF खात्यात 6 लाखांपर्यंतचा विमा
तुमच्या पीएफ खात्यावर बाय डीफॉल्ट विमा उपलब्ध आहे. EDLI (Employee Deposit Linked Insurance) योजनेअंतर्गत, PF खात्यावर 6 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत खातेदाराला एकरकमी पेमेंट मिळते. त्याचा लाभ कोणत्याही आजार किंवा अपघात आणि मृत्यूच्या वेळी घेता येतो.

2. निवृत्तीनंतर पेन्शन
पीएफ खात्यात 10 वर्षे नियमित पेन्शन जमा केल्यास, खात्यावर कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ उपलब्ध आहे. जर एखादा खातेदार 10 वर्षे नोकरीत राहिला आणि त्याच्या खात्यात रक्कम जमा होत राहिली, तर कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत, त्याला निवृत्तीनंतर किमान एक हजार रुपये पेन्शन मिळते. मात्र, आता पेन्शन फंडात वाढ केल्याची चर्चा आहे.

3. निष्क्रिय खात्यांवर व्याज 
EPFO ने काही वर्षांपूर्वी निष्क्रिय खात्यांवर व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे, पूर्वी असे नव्हते. ज्या खात्यांमध्ये तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही त्यांना निष्क्रिय खात्यांच्या श्रेणीत टाकले जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही नोकरी बदलताच तुमचे पीएफ खाते हस्तांतरित केले पाहिजे. असे न केल्यास खाते पाच वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय राहील आणि पैसे काढण्याच्या वेळी त्यावर कर भरावा लागेल.

4. पीएफ खात्यातील पैसे ट्रान्सफर
नोकरी बदलल्यावर पीएफचे पैसे ट्रान्सफर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. आधारशी लिंक केलेल्या तुमच्या युनिक नंबरद्वारे तुम्ही एकाच युएएनवर एकापेक्षा जास्त पीएफ खाते ठेवू शकता. नवीन नोकरीत सामील झाल्यावर EPF च्या पैशांचा क्लेम करण्यासाठी फॉर्म-13 भरण्याची गरज नाही. EPFO ने गेल्या नवीन फॉर्म-11 जारी केला आहे. ज्या द्वारे तुमचे खाते ट्रान्सफर करता येईल.

5. एका तासात खात्यात पैसे
तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. हे पैसे तुमच्या खात्यात पोहोचायला तीन ते चार दिवस लागतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने नवीन सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत अर्ज केल्यानंतर तासाभरात खात्यात पैसे येतील. मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

याशिवाय तुम्ही घर खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण किंवा मुलीच्या लग्नासाठी पीएफचे पैसे काढू शकता.

EPFO Account Benefits, EPFO, Benefit Of Epfo, EPF Interest Rate, PF, Provident Fund,

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x