दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके! 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, पाहा VIDEO

Delhi Earthquake News in Marathi : दिल्लीमध्ये सध्या भूकंपाचे धक्के जाणवू जाणवले आहे. लोकांनी मोकळ्या जागी धाव घेतली अन् जीव वाचवला.

Updated: Oct 15, 2023, 09:47 PM IST
दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके! 3.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, पाहा VIDEO title=
Delhi earthquake

Delhi Earthquake Latest News: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर आज पुन्हा दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याने अनेकांची भंबेरी उडाली होती. त्यानंतर आता  नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

हरियाणाच्या फरिदाबाद येथे आज (१५ ऑक्टोबर) दुपारी ४.०८ वाजता ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितलं आहे. गेल्या आठ दिवसात तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

भूकंप का होतात?

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे बेन्ड होतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि गडबड झाल्यानंतर भूकंप होतो.

भूकंपाची तीव्रता कशी मोजतात?

रिश्टर स्केल वापरून भूकंप मोजले जातात. त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. भूकंप 1 ते 9 रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाचे मोजमाप त्याच्या केंद्रस्थानावरून केले जाते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता त्यावरून मोजली जाते. ही तीव्रता भूकंपाची तीव्रता ठरवते.