नवी दिल्ली : सेना दिवसच्या तयारी करताना ३ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. सेना दिवसाच्या सरवादरम्यान रश्शी निसटल्याने ही दुर्घटना घडली आहे.
एका व्हिडिओमध्ये हॅलीकॉप्टर ४० ते ५० फूट ऊंचीवर दिसत आहे. त्यातून ३ सेना जवान रश्शीच्या सहाय्याने उतरत आहेत.
अचानक रश्शी घसरून खाली आली आणि जवान देखील खाली पडले.
हॅलीकॉप्टरच्या बूममध्ये आलेल्या खराबीमूळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तीनही जवान सुस्थिस्थीत असल्याचेही सांगण्यात आहे.
दरम्यान या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. आर्मी परेड ग्राऊंडमध्ये सेना जवानांचा अभ्यास सुरू होता. ऑपरेशनच्या डेमो दरम्यान ही घटना घडली.
Video of Army Day parade rehearsal helicopter mishap on Jan 9 goes viral. Slithering rope breaks off ALH while jawans are using it.
Army says it happened due to chopper boom malfunction. pic.twitter.com/xSMX7dIcjG— Man Aman Singh Chhina (@manaman_chhina) January 11, 2018
दरवर्षी 'सेना दिवस' उत्सव साजरा केला जातो. यावेळी सैनिक वेगवेगळ्या कसरती करतात. तसेच देशातील बहादुर शहिद जवांनांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली जाते.