मुंबई : अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सहा दिवसांमध्ये १८ हजार कोटी रुपयांचं सामान विकलं गेलं आहे. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या सहा दिवसांमध्ये जवळपास २१ हजार३३५ कोटी रुपये विक्री झाली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनची भागीदारी ९० टक्के आहे. दिवाळीपर्यंत अॅमेझॉन-फ्लिपकार्टची विक्री ४२ हजार कोटीपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बंगळुरुची रिसर्च कंपनी रेडसीयर कंसल्टेंसीच्या रिपोर्टनुसार, ६ दिवसात वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉनने १८ हजार कोटींचं सामान विकलं आहे.
सणासुदीच्या काळात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून अनेक ऑफर्स दिल्या जातात. दिवाळीपर्यंत फक्त अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपनींची विक्री ६ अरब डॉलर म्हणजेच ४२,६७१ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
रेडसीयर कंसल्टिंगचे संस्थापक आणि सीईओ अनिल कुमार यांनी न्यूज एजेंसी आईएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटातही सणासुदीच्या काळात तीन अरब डॉलरची खरेदी झाली. ज्यामुळे ऑनलाईन खरेदीला येणाऱ्या काळात आणखी महत्त्व येण्य़ाची चिन्ह आहेत.
फ्लिपकार्टवर ६० ते ६२ टक्के खरेदी झाली. फ्लिपकार्टची सहकंपनी Myntra आणि Jabong ची विक्रीसह एकूण विक्री ६३ टक्के जाण्याची शक्यता आहे.
अॅमेझॉनच्या विक्रीत देखील ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. या ऑफरच्या काळात ५५ टक्क्याहून अधिक ही मोबाईलची विक्री झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे छोट्य़ा शहरांमधून देखील ऑनलाईन वस्तूंची मागणी वाढली आहे.