कोरोना: 24 तासात 14,516 रुग्णांची वाढ, तर मृतांचा आकडा ही वाढला

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

Updated: Jun 21, 2020, 12:51 PM IST
कोरोना: 24 तासात 14,516 रुग्णांची वाढ, तर मृतांचा आकडा ही वाढला title=

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण 4 लाखांच्या पुढे गेले आहेत. रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 410,461 वर गेली आहे. आतापर्यंत 2,27,756 रुग्ण बरे झाले आहेत. या साथीने आतापर्यंत 13,254 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 15,413 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या 24 तासांत 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 55.48% टक्के झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 13925 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तर 169451 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 68,07,226 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. एका दिवसात म्हणेजच गेल्या 24 तासांत 190730 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

देशात सलग नवव्या दिवशी 10 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 1 जून ते 20 जून दरम्यान देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दोन लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही देशातील पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे, ज्यात कोविड -१९ च्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

भारतात मृत्यूचे प्रमाणही वाढले

त्याचबरोबर कोविडमुळे शुक्रवारी सकाळपर्यंत 375 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी महाराष्ट्रात 142, दिल्लीत 66, तामिळनाडूमध्ये 41, गुजरातमध्ये 27, उत्तर प्रदेशात 23, पश्चिम बंगालमध्ये 11, राजस्थान, कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी 10 जणांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये, बिहारमध्ये सहा, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी चार आणि तेलंगणमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर जागतिक महामारीचा सर्वाधिक परिणाम भारतात दिसून येत आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वाधिक मृत्यूंच्या बाबतीत भारत आठव्या क्रमांकावर आहे.