मुंबईपेक्षा दिल्लीत कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Updated: Jun 21, 2020, 09:54 AM IST
मुंबईपेक्षा दिल्लीत कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला title=

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित शहर म्हणून दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. 12 जूनपासून दिल्लीत दररोज 2 हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. 18 जून रोजी दिल्ली आणि चेन्नई या दोन्ही शहरांमध्ये मुंबईपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत.

मुंबईत कोरोनाचे 64,139 रुग्ण आहेत. तर दिल्लीत 53,116 रुग्ण आहेत. पण दिल्लीने तामिळनाडूला मागे टाकलं आणि देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणून पुढे आली आहे.

18 जून रोजी दिल्लीमध्ये 2,877 रुग्ण वाढले होते. त्यानंतर दिल्ली देशातील दुसरं सर्वात प्रभावित शहर बनलं आहे. त्याच दिवशी दिल्लीपेक्षा चिलीमधील सॅंटियागो येथे 4,421 रुग्ण वाढले. जगातील पाच सर्वात गंभीर शहरांमध्ये चेन्नई आणि मुंबईचा समावेश आहे. पेरुचे लिमा शहरात 18 जून रोजी 1,666 रुग्ण वाढले आणि ते जगातील तिसरे सर्वाधिक प्रभावित शहर बनले.

साओ पाउलो (ब्राझील) यासह जगातील इतर बाधित शहरांमध्ये 18 जून रोजी तीन भारतीय हॉटस्पॉट शहरांपेक्षा कमी रुग्ण वाढले आहेत. परंतु आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या पाहिल्यास लॅटिन अमेरिकेच्या तीन मोठ्या शहरांपैकी असलेल्या सॅंटियागो, लिमा आणि साओ पाउलो येथे भारतीय शहरांपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत.

देशातील इतर शहरांच्या तुलनेच दुप्पटीने रुग्णांची संख्या वाढत आहेत. येथे 12 दिवसांत रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. मागील आठवड्यापेक्षा हा वेग जास्त आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या आणि एकूण मृत्यू यात दिल्लीचा वाटा अधिक आहे. आतापर्यंत देशातील पुष्टी झालेल्यांपैकी 13 टक्के रुग्ण एकट्या दिल्लीत आहेत. 18 जूनपर्यंत भारतात एकूण 3,81,095 रुग्ण होते. ज्यापैकी 49,979 रुग्ण दिल्लीतील आहेत.

देशांच्या एकूण मृत्यूंमध्ये दिल्लीचा मोठा वाटा आहे. भारतात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 15 टक्के मृत्यू हे दिल्लीतील आहे. 18 जूनपर्यत भारतात 12,606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 1,969 रुग्णांचा मृत्यू एकट्या दिल्लीत झाला आहे.