'कोणार्क मंदिरा'सह लवकरच येतेय १० रुपयांची नवी नोट!

दोन हजार, पाचशे, दोनशे आणि पन्नास रुपयानंतर आता रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे.

Updated: Jan 6, 2018, 10:28 AM IST
'कोणार्क मंदिरा'सह लवकरच येतेय १० रुपयांची नवी नोट! title=

मुंबई : दोन हजार, पाचशे, दोनशे आणि पन्नास रुपयानंतर आता रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे.

दहा रुपयाची ही नवी नोट तपकिरी रंगाची असून त्यावर भारतीय संस्कृतीची छाप असेल. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेली महात्मा गांधी सीरिजमधील ही नोट असेल.

या नोटेवर कोणार्कमधील सूर्यमंदिराचं चित्र असेल. या नोटेची छपाई सध्या रिझर्व्ह बँकेकडून सुरु करण्यात आली असून लवकरच ती चलनात येणार आहे. 

आरबीआयनं या नव्या नोटेचा फोटो जाहीर केलाय. गेल्याच आठवड्यात या नव्या नोटेचं डिझाईन निश्चित झालं होतं. त्यानंतर आता तिची छपाई सुरु झालीय.

जवळपास तेरा वर्षानंतर दहा रुपयाची नवी नोट चलनात येतेय. यापूर्वी २००५ मध्ये दहा रुपयाच्या नोटेत बलदल करण्यात आला होता.