बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन

बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन

शैलेश मुसळे | Updated: Feb 26, 2020, 09:32 AM IST
बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन  title=

नवी दिल्ली : बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन वायुदल साजरा करणार आहे. त्याप्रित्यर्थ आज वायुसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदोरिया मिग 21 हे लढाऊ विमान उडवणार आहेत. पाकिस्तान सीमेलगत असलेल्या हवाई क्षेत्रात भदोरिया मिग 21 उडवणार आहेत. या भागात तैनात असलेल्या 51 व्या स्क्वाड्रनमधून भदोरिया मिग 21 उडवणार आहेत. विशेष म्हणजे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ 16 पाडताना जे फॉर्मेशन केलं होतं तेच फॉर्मेशन भदोरिया साकारणार आहेत.

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर देशाच्या राजकारणात एक वेगळा बदल झाला. पहिल्यांदा सरकारने पीओकेला भारताचा अभिन्न अंग असून तो परत घेण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत असं सांगण्यात आलं. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर देखील भारताने आपली बाजू सक्षमपणे मांडली. ज्यामुळे पाकिस्तानला कोणत्य़ाच महत्त्वाच्य़ा देशांनी पाठिंबा दिला नाही. उलट अनेक मुस्लीम देश देखील भारताच्या बाजुने उभे राहिले.

भारतीय हवाई दलाच्या जवानांनी थेट पाकिस्तानी सीमेच्या लगत कारवाई केली. ज्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यात आले. भारताने यानंतर 6 महिन्यात जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 काढून घेतलं आणि पाकिस्तानची कंबर मोडली.

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या सीआरपीएच्या ताफ्यावर हल्ल्यानंतर देशभरात एकच भावना होती की याचा बदला घ्या. 40 जवान या हल्ल्यात शहीद झाल्यानंतर मोदी सरकारने देखील दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आणि संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली. एअर स्ट्राईकनंतर संपूर्ण देशातून याचं कौतूक झालं. त्यानंतर पीओके पुन्हा मिळवण्यासाठी वक्तव्य होऊ लागली.