Earn Money: 1 रुपयाच्या नोटेमुळे व्हाल लखपती! एका नोटेसाठी मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या कसं?

तुम्हालाही जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Updated: Jun 26, 2022, 04:08 PM IST
Earn Money: 1 रुपयाच्या नोटेमुळे व्हाल लखपती! एका नोटेसाठी मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या कसं? title=

Earn Money Idea: तुम्हालाही जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. तुम्ही घरबसल्या लाखोंची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचीही गरज नाही. जर तुमच्याकडे ही खास एक रुपयाची नोट असेल तर तुम्हाला त्याचे 7 लाख रुपये सहज मिळतील.

27 वर्षांपूर्वी, भारत सरकारने एक रुपयाची नोट बंद केली होती. परंतु जानेवारी 2015 मध्ये तिची छपाई पुन्हा सुरू झाली, त्यानंतर ही नोट बाजारात आणली गेली. पण आज आम्ही स्वातंत्र्यापूर्वीच्या एका रुपयाच्या नोटेबद्दल बोलत आहोत, ज्याद्वारे तुम्ही लखपती होऊ शकता.

7 लाख रुपयांना विकल्या गेलेल्या या नोटेची खास गोष्ट म्हणजे ही स्वातंत्र्यापूर्वीची एकमेव नोट आहे, ज्यावर तत्कालीन गव्हर्नर जे डब्ल्यू केली यांची स्वाक्षरी आहे. ही नोट 80 वर्षे जुनी आहे. ही नोट ब्रिटिश भारताने 1935 मध्ये जारी केली होती. याशिवाय 1966 च्या एका रुपयाच्या नोटेची किंमत 45 रुपये आहे. त्याच प्रकारे, 1957 ची नोट 57 रुपयांना उपलब्ध आहे.

जर तुमच्याकडे अशा नोटांचा संग्रह असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. तुम्ही तुमचा हा संग्रह eBay वर विकू शकता. 1949, 1957 आणि 1964 च्या 59 नोटांच्या बंडलच्या बदल्यात तुम्ही पूर्ण 34,999 रुपये कमवू शकता. त्याच वेळी, 1957 च्या एक रुपयाच्या नोटेच्या बंडलमधून तुम्ही 15 हजार रुपये कमवू शकता. अशाप्रकारे या काही खास नोट्स तुम्हाला घरात बसून लखपती बनवू शकतात.