अजूनही लस घेतली नाहीये; आता घ्यावे लागणार 3 डोस

फार्मास्युटिकल कंपनी ही लस खाजगी बाजारात उपलब्ध करून देण्याचा विचार करतंय. 

Updated: Feb 2, 2022, 11:35 AM IST
अजूनही लस घेतली नाहीये; आता घ्यावे लागणार 3 डोस title=

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यापूर्वी लसीचे 1 किंवा 2 डोस घ्यावे लागत होते. मात्र आता लवकरच 3 डोस असलेली कोरोना लस घ्यावी लागणार आहे. Zydus कंपनी तीन डोस असलेल्या कोरोना लसीचा भारताला पुरवठा करणार आहे.

Zydus कंपनीकडून सांगण्यात आलंय की, कंपनीने तिची तीन डोस असलेली कोरोना लस ZyCoV-D भारत सरकारला पुरवण्यास सुरुवात केली आहे. फार्मास्युटिकल कंपनी ही लस खाजगी बाजारात उपलब्ध करून देण्याचा विचार करतंय. 

Zydus Cadila लसीचे तीन डोस दिले जातील. या लसीला केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये मान्यता दिली होती.

जेनेरिक औषध कंपनीने ZyCoV-D च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीसाठी अर्ज करण्यापूर्वी 28 हजार स्वयंसेवकांवर याची चाचणी घेतली होती. यामध्ये कोरोनाविरूद्ध 66.6 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं होतं. 12 ते 18 वयोगटातील लोकांसाठीही ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे.

ही भारतातील दुसरी स्वदेशी लस आहे. यापूर्वी, भारत बायोटेक आणि ICMR यांनी मिळून पहिली स्वदेशी लस 'कोव्हॅक्सीन' बनवली होती. सध्या देशात एकूण 5 लसींना परवानगी मिळाली आहे.