अळशी खाण्याचे असेही फायदे

आकाराने छोट्याशा अळशीचे मोठे फायदे...

Updated: Nov 10, 2019, 03:08 PM IST
अळशी खाण्याचे असेही फायदे title=
संग्रहित फोटो

मुंबई : अळशी (Flaxseeds)आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अळशी खाण्याचे  शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अळशीमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.

- अळशीमध्ये लिगनेन असतं. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोज थोडी अळशी खाल्याने मधुमेह होण्याचा धोका अतिशय कमी होतो.

- काही दिवसांपूर्वी एका संशोधनातून असं समोर आलं की, अळशीच्या नियमित सेवनाने स्तन कॅन्सर, प्रोस्टेट (पौरुष ग्रंथीचा कॅन्सर) कॅन्सर आणि कोलोन (मोठं आतडं) कॅन्सरचा धोकाही कमी होतो. 

- अळशीमध्ये ओमेगा-३ असतं जे, बॅड कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतं.

- अळशी व्हिटॅमिन बीचा स्त्रोत आहे. रोज एक चमचा अळशी खाल्याने त्वचा मॉइस्चराइज राहण्यास मदत होते. यात असणारं व्हिटॅमिन ई केसांचं आरोग्य राखण्यासही फायदेशीर ठरतं.

- अळशीमुळे पचनशक्ती चांगली, सुरळित राहते. शरीराला उर्जा मिळते. अळशीमध्ये फायबर असतं, जे पचनशक्ती सुधारतं.

  

- अळशीमध्ये प्रोटीन असल्याने ते महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे.

- अळशीच्या सेवनाने महिलांचा मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास मदत होते. 

- दररोज अळशी खाल्ल्याने संधीवात, सांधेदुखीमध्येही आराम पडतो. हाडं मजबूत होण्यास मदत होते. 

त्यामुळे दररोज एक चमचा अळशी खाणं, शरीर अधिक सुदृढ, निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.