Long Hair Home Remedies : केसांची वाढ न होणे, केस दाट नसणे, केसांची चमक निघून जाणे आणि केस गळणे या समस्या आपण सर्वत्र पाहत असतो. अनेकदा या समस्यांना कंटाळून लोक महागड्या प्रोडक्टस वर खर्च करतात पण असं केल्याने हवा तसा परिणाम मिळत नाही. कधी कधी तर त्या प्रोडक्ट्सचा वापर योग्य नाही केल्यास समस्या वाढू शकतात. (You can grow long hair by using eggs nz)
केसांमुळे महिलांना शोभा येते असं सांगितले जाते. आता हे कितपत खरं आहे यावर अजूनही स्पष्टता मिळालेली नाही. पण मुलींना आपले केस लांब आणि चमकदार हवे असतात. मग त्याकरिता त्या अनेक उपाय करताना दिसतात. केस गळण्याची कारणे अनेक असू शकतात पण काही वेळेस केसांच्या मुळांमध्ये जीवनसत्त्वांची कमतरता असल्यामुळे केस गळण्याचे प्रमाण जास्त दिसते. अशा परिस्थितीत महिला अनेक घरगूती उपाय करुन पाहतात. तर आज आम्ही तुम्हाला केस लांब होण्यासाठी अंड्यांचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत.
1. अंड आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स तुम्ही एक मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण केसांना 10 मिनिटे लावा. असे केल्याने केस दाट होऊ शकतात. अंड्यांपासून बनवलेला हा हेअर मास्क केवळ मुळांना पोषकच नाही तर आठवड्यातून दोनदा लावल्याने केसांचा पोतही सुधारू शकतो.
2. अंड आणि कोरफड या दोन्ही गोष्टीचे एका भांड्यात मिश्रण तयार करा आणि डोक्यावर 40 ते 50 मिनिटे लावा. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. असे केल्याने केसही दाट होऊ शकतात. या हेअर मास्कचा वापर केल्याने केसांची वाढ तर होतेच पण केस निरोगीही होतात.
3. मेंदी आणि अंड हे दोन्ही एका भांड्यात मिसळा आणि थोड्या वेळासाठी हे मिश्रण केसांना लावा. असे केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो या पेस्टमुळे केस गळणे कमी होते तर केसांची चमक देखील वाढवू शकते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)