पावसाळ्यात आजरपणापासून दूर राहण्यासाठी फक्त या गोष्टी करा

पावसाळ्यात आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आधीच काळजी घेतली तर तुम्ही स्वत:चा बचाव करु शकतात.

Updated: Jul 11, 2022, 09:54 PM IST
पावसाळ्यात आजरपणापासून दूर राहण्यासाठी फक्त या गोष्टी करा title=

मुंबई : पावसाळा सुरु झाला की अनेक जण आजारी पडतात. पावसाळ्यात निरोगी राहणे आव्हानात्मक असते. आर्द्रतेमुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो, तर दुसरीकडे पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होते, जे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे कारण बनतात. याशिवाय पचनाशी संबंधित समस्याही झपाट्याने वाढतात.

पावसाळ्यात विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरतो. डासांची संख्या वाढते. मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया होतो. शिवाय टायफॉइड आणि पोटात संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छता आणि खाण्यापिण्याची काळजी घ्यावी.

झोपताना मच्छरदाणी लावा. किंवा मच्छर चावणार नाही त्यामुळे क्रीम किंवा तेल वापरावे. घरातून बाहेर पडताना पूर्ण अंग झाकणारे कपडे घालावेत. पावसाचे पाणी साचू देऊ नका आणि कूलरचे पाणी बदलत राहा. जंक फूड खाणे टाळा आणि घरी शिजवलेले ताजे अन्न खा. स्वच्छ पाणी प्या आणि ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असते. डेंग्यू आणि मलेरियाच्या बाबतीत, मधुमेही लोकांना गंभीर संक्रमण होऊ शकते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडू शकते. न्यूरोलॉजिकल समस्येमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये संवेदना होत नाही. त्यामुळे या ऋतूत त्यांनी पायांची काळजी घेणे गरजेचे आहे. याशिवाय, हृदय व मूत्रपिंडाचे रुग्ण तापामुळे हृदयक्रिया बंद पडणे, मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या गंभीर परिस्थितीतही अडकू शकतात.

रोज व्यायाम केला पाहिजे आणि सकस आहार घेतला पाहिजे. औषधे वेळेवर घ्यावीत आणि कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होता कामा नये. हृदय आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनाही हेच लागू होते. कोणत्याही परिस्थितीत बचाव करण्याशिवाय पर्याय नाही.

शरीरातून घाम जात नसल्याने फंगल इन्फेक्शन, एक्जिमा, अॅलर्जीचा त्रास होतो. चेहऱ्यावर मुरुम येतात आणि केस गळण्याची समस्याही वाढते. ज्यांना आधीच त्वचेशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी पावसाळा खूप आव्हानात्मक असतो. याशिवाय पावसात भिजणे देखील त्वचेसाठी धोकादायक आहे.

बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी अँटीफंगल पावडर किंवा क्रीम वापरावे. स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्यानंतर पावसात भिजल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावावे. मॉइश्चरायझर त्वचेची आर्द्रता टिकून ठेवते. संक्रमणापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करते. केसगळतीची समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून दोनदा खोबरेल तेलाने मसाज करा आणि शॅम्पूनंतर कंडिशनर वापरा. चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या टाळण्यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा आणि धुळीपासून संरक्षण करा. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा आणि जंक फूड टाळा. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या.

स्ट्रीट फूडमध्ये वापरल्या जाणाऱ्या दूषित पाण्याचा लोकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. या ऋतूमध्ये लोकांना पोटात जंतुसंसर्ग, लूज मोशन आणि गॅस्ट्र्रिटिसचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात स्वच्छतेची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. दूषित पाण्यामुळे मलेरिया, कॉलरा, कावीळ यासह अनेक आजार होऊ शकतात.

बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळावे. घरी तयार केलेले अन्न 3 तासांपेक्षा जास्त ठेवल्यास ते टाळावे. ताजे अन्न शरीरासाठी फायदेशीर असते. जेवताना स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. या ऋतूमध्ये आले, लसूण आणि लिंबू यांचा आहारात समावेश करावा.