World Organ Donation Day : आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव अतिशय महत्त्वाचा असतो. त्यातील एखादा अवयव निकामी झाल्यास त्या व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. (#worldorgandonationday) पण आज वैद्यकीय शास्त्राने एवढी प्रगती केली आहे की, एखाद्या व्यक्तीच्या अवयव दानामुळे जीव धोक्यात असलेल्या व्यक्तीला नवीन जन्म मिळतो. त्यामुळे अवयव दानाबद्दल लोकांमध्ये जागृता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. (world organ donation day 2023 can living donors donate heart lung liver know what experts say how to register and importance in marathi)
जिवंत किंवा मृत दाते त्यांचे अवयव एखाद्या गरजू रुग्णाला दान करु शकतात. मात्र जिवंतपणी कुठले अवयव दान करु शकतो. अवयव दान करण्याची प्रक्रिया काय आहे. त्याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. डॉ. मनोज डोंगर, वरिष्ठ सल्लागार, एचपीव्ही आणि यकृत प्रत्यारोपण सर्जन, डीपीयू खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी पुणे यांनी आपल्या या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो सुमारे 7 ते 8 लोकांना नवीन जीवन देऊ शकतो. किडनी, यकृत आणि स्वादुपिंड प्रत्यारोपण हे एकमेव प्रकारचे अवयवदान जिवंत दात्यांकडून शक्य आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलंय. जिवंत दात्याकडून फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण सध्या शक्य नाही. तथापि, जिवंत दात्यांच्या फुफ्फुस, हृदय आणि स्वादुपिंडाच्या काही भागांचे प्रत्यारोपण करण्याच्या शक्यता तपासण्यासाठी संशोधन चालू आहे.
तर दुसरीकडे एम्सचं संचालक डॉ. एम. श्रीनिवास म्हणाले की, ''हृदय हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असून तो निकामी झाल्याने व्यक्तीचं जीव धोक्यात येतं. ते म्हणाले की, आतापर्यंत 85 यशस्वी हृदयाच्या चाचण्या केल्याबद्दल एम्समधील वैद्यकीय पथकांचा आम्हाला अभिमान आहे." हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर (CVD) उपचारांमध्ये हृदय प्रत्यारोपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जे देशातील मृत्यू आणि अपंगत्वाचं प्रमुख कारण आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार, देणगीदारांची संख्या (मृत व्यक्तींसह) 2014 मध्ये 6,916 वरून 2022 मध्ये केवळ 16,041 पर्यंत वाढला आहे. हा आकडा खूपच कमी असल्याचं इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट्सचे सचिव विवेक कुटे म्हणाले.
अवयव प्रत्यारोपणाने व्यक्तीचं प्राण वाचू शकतात पण हेच तेव्हाच शक्य आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपले अवयव दान करते. दात्याची जिवंत असताना अवयवदानाच्या जागेवर नोंदणी करावी लागतं. तर मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी अवयव आणि ऊती दान करण्यास संमती द्यावी लागते.
1 सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून डोनर फॉर्म डाउनलोड करा. याशिवाय तुम्हाला अवयव दाता बनण्याची काही अधिकृत वेबसाइट्स नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट (NOTTO), रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट (ROTTO) सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि मुंबईतील केईएम हॉस्पिटल, सरकारी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ओमनादुरर, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावरही तुम्ही नोंदणी करु शकता.
2 आता फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, "अवयव/शरीर दान" फॉर्म व्यवस्थित भरा.
3 त्यानंतर तुम्हाला देणगीदाराच्या फॉर्मवर दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यांची आवश्यकता असता. त्यापैकी एक दात्याचा जवळचा नातेवाईक असणं बंधनकारक आहे.
4 अर्ज भरल्यानंतर तो स्वीकारला गेल्यानंतर तुम्हालानोंदणी क्रमांक असलेले डोनर कार्ड तुमच्या अधिकृत पत्त्यावर पाठवलं जातं.
5 एखादी व्यक्ती एकदा दाता बनल्यानंतर, त्याने/तिने हा निर्णय त्याच्या/तिच्या कुटुंबियांना आणि मित्रांसह शेअर करणे गरजेचं आहे.