Depression मध्ये असणाऱ्या व्यक्ती Google वर सर्वाधिक काय Search करतात?

तुम्हाला कोणत्या गोष्टीचं दडपण आलंय का? 

Updated: Oct 10, 2022, 01:15 PM IST
Depression मध्ये असणाऱ्या व्यक्ती Google वर सर्वाधिक काय Search करतात?  title=
World Mental Health Day 2022 what do depressed people search on google

World Mental Health Day 2022 :  गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात काही असे आजार, अशा व्याधी फोफावत आहेत ज्यांकडे सुरुवातीला प्रचंड दुर्लक्ष करण्यात आलं. सध्याही गांभीर्यानं पाहिलं जात नाही अशा मुद्द्यांमध्ये नैराश्य, तणाव यांचाही समावेश होतो. ऐकून धक्का बसेल, पण नैराश्य (Depression) येत्या काळात एका महामारीचं (Pandamic) स्वरुप धारण करु शकतं. बदलत्या जीवनशैलीमध्ये मानवी आयुष्य इतकं विचित्र वळणावर आलं आहे की अनेकांचं मानसिक आरोग्य ढासळू लागलं आहे. 

(Job pressure) नोकरीच्या ठिकाणी असणारा तणाव, सहकाऱ्यांच्या अपेक्षा, वादावाद, घरामध्ये असणारं वातावरण ((Family), आर्थिक जुळवाजुळव, प्रेमभंग (breakups), घटस्फोट (Divorce) अशा असंख्य समस्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करु लागल्या आहेत. (Corona) कोरोना काळानंतर मानसिक आरोग्याच्या तक्रारींमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी नैराश्य आणि तत्सम मुद्द्यांवर कोणताही न्यूनगंड न बाळगता बोलण्याची गरज आहे. 

अधिक वाचा : 5G Network मुळे होऊ शकतं मोठं नुकसान! जाणून घ्या...

 

तुम्हाला माहितीये का अनेक अशी मंडळी आहेत जी त्यांच्या मानसिक स्थितीबाबत जवळच्यांशी बोलण्याऐवजी थेट गुगलचा (Google) आधार घेतात. एका मर्यादेपर्यंत गुगलचा आधार घेणं ठीक, पण त्यापलीकडे मात्र मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही उत्तम. कारण, या गोष्टींविषयी मोकळेपणानं बोलणं कधीही उत्तम. 

Google वर Depression चा सामना करणारी मंडळी काय Search करतात? 
- नैराश्यात हृदयाचे ठोके वाढतात का? 
- मला सतत वाईट का वाटतं? झोप का येते? 
- मी सतत का थकतो/ थकते? 
- डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? 
- डिप्रेशन किंवा नैराश्याची लक्षणं काय? 
- मी एकटी राहते/ राहतो, हे डिप्रेशन तर नाही? 
- Depression ची लक्षणं काय? 
- Depression आजार आहे का? 
- Depression test कशी करतात? 
- मन प्रसन्न करण्यासाठी काय करावं? 
- सर्वोत्तम 10 मानसोपचार तज्ज्ञ Depression विषयी काय म्हणतात? 
- Depression मुळे हृदयरोगाचा झटका येतो का? 
- Depression आणि Anxiety मधला फरक काय? 

वरील मुद्दे आणि प्रश्नांव्यतिरिक्त इतरही असंख्य प्रश्न एकट्या Depression विषयी गुगलला विचारले जातात. तुम्हीही असं काहीतरी करताय का? सर्वात आधी कोणाकडेतरी मन मोकळं करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.