ब्रा मुळे स्तनाचा कर्करोग होतो का? जाणून घ्या यावर तज्ञांचे मत

महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ज्यावर बरेच लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात.

Updated: Jul 20, 2022, 04:50 PM IST
ब्रा मुळे स्तनाचा कर्करोग होतो का? जाणून घ्या यावर तज्ञांचे मत title=

मुंबई : महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. ज्यावर बरेच लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्याच वेळी, तुम्ही हेही ऐकले असेल की, जर तुम्ही घट्ट ब्रा घातली किंवा काळी ब्रा घातली तर त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. मात्र, यात किती तथ्य आहे आणि ही फसवणूक किती आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की ब्रेस्ट कॅन्सरमागे ब्रा कारणीभूत आहे की नाही? 

यासाठी आम्ही NIIMS च्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मोनिका सिंग यांच्याशीही बोललो आहोत. चला त्यांच्याकडून जाणून घेऊ या, माहिती

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?

डब्ल्यूएचओच्या मते, महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची समस्या अधिक सामान्य होत आहे. हा कर्करोग दरवर्षी जगभरातील 2.1 दशलक्ष महिलांना प्रभावित करतो. या स्थितीत, जीन्समधील बदलांमुळे स्तनाच्या पेशी विभाजित होतात आणि वाढतात किंवा नियंत्रणाबाहेर पसरतात.

मग आता प्रश्न हा उभा राहातो की, ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो का?

तज्ज्ञांच्या मते, ब्रा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा थेट संबंध आढळून आलेला नाही. याचा अर्थ हा निव्वळ भ्रम आहे, त्यामुळे महिलांमध्ये गैरसमज वाढत आहेत. अनेक ठिकाणी असंही ऐकायला मिळेल की, अंडरवायर ब्रा किंवा टाईट ब्रा घातल्याने लिम्फमधील रक्ताभिसरण थांबते, ज्यामुळे कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो, पण आम्ही तुम्हाला सांगतो की हा देखील एक भ्रम आहे.

म्हणजेच, ज्यांचा हा समज आहे की, ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, त्यांना सांगा की हा समज चुकीचा आहे.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. जेव्हा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाची समस्या असते, तेव्हा त्यांना स्तनाच्या आज वजनदार ढेकूळ असल्याचे जाणवते. याशिवाय स्तनाग्र लाल होणे, गुठळ्या होणे किंवा हाताखाली सूज येणे, स्तनाच्या आकारात बदल होणे किंवा स्तनाग्र भागातून रक्त येणे यासारख्या समस्या दिसू शकतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)