मुंबईकरांनो वेळीच सावध व्हा...मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोचं थैमान...

मुंबईत कोरोना आटोक्यात आला असला तरी मुंबईकरांवर नवं संकट ओढवलं आहे. 

Updated: Jul 20, 2022, 03:37 PM IST
मुंबईकरांनो वेळीच सावध व्हा...मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोचं थैमान... title=

मुंबई - आता मुंबईकरांना सावध करणारी बातमी आहे. मुंबईत कोरोना आटोक्यात आला असला तरी मुंबईकरांवर नवं संकट ओढवलं आहे. गेल्या आठवड्यात पावसाळी आजारांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. या महिन्यात लेप्टोच्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे. तर डेंग्यूचाही प्रादुर्भाव कायम असून 33 रुग्णांचे निदान झालं आहे. 

मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे?

जर तुम्हाला ताप हा 2-3 दिवसापेक्षा जास्त असल्यास तुम्हाल साथीच्या रोगांची लागण झाल्याची शक्यता आहे. तसंच जर तुम्हाला थंडी, पुरळे येणे, डोकेदुखी होत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जा. ही लक्षण जाणवल्यास वेळीच सावध व्हा. ही लक्षणे मलेरिया, डेंग्यूची असू शकतात. पावसाळ्यात खास करुन लहान मुलं आणि वृद्धांकडे विशेष लक्ष द्या. 

कावीळची शक्यता

जर तुम्हाला ताप, उलट्या, जुलाब होत असेल आणि डोळे पण पिवळसर दिसत असतील तर तुम्हाला कावीळ झाल्याची शक्यता आहे. अशावेळी घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टारांचा सल्ला घ्यावा. 

अशी घ्या काळजी 

- घरातील खिडक्यांना मच्छरवाली जाळी बसवा
- संध्याकाळच्या वेळी दारे, खिडक्या बंद करा
- लहान मुलांना पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला
- ओले कपडे घरात ठेवू नका
- घर कोरडे राहिल याची काळजी घ्या
- कुंड्या आणि इतर भांड्यामध्ये पाणी साचू देऊ नका
- लहान मुलांना घरबाहेर पाठवताना 'डास प्रतिरोधक' क्रीम लावा
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करा 

 'या' पदार्थांचा समावेश करा

- कच्च्या पपईच्या पानांचा रस
- किवी फळ
- ड्रॅगन फ्रूट
- दूध
- सूप
- अंडी