ओमायक्रोनवर हे औषध ठरणार प्रभावी?

जगभराची चिंता वाढवलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत ब्रिटीश शास्त्रज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे. 

Updated: Dec 8, 2021, 08:21 AM IST
ओमायक्रोनवर हे औषध ठरणार प्रभावी? title=

मुंबई : जगभराची चिंता वाढवलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत ब्रिटीश शास्त्रज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे. या शास्त्रज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सोट्रोविमॅब (Sotrovimab) हे औषध ओमिक्रॉनच्या प्रत्येक म्युटेशनविरूद्ध प्रभावी आहे.

यूकेच्या या शास्त्रज्ञाने सांगितलं की, त्यांनी हे विशेष औषध GlaxoSmithKline (GSK) ने यूएस भागीदार वीर (VIR) बायोटेक्नॉलॉजीच्या सहकार्याने विकसित केलं आहे. आता हे औषध Omicron प्रकाराविरूद्ध प्रभावी मानलं जात आहे.

जगासाठी दिलासादायक माहिती

ही कोविड-19 अँटीबॉडी-आधारित थेरपी विकसित करणार्‍या कंपनी GSK ने सांगितले की, सोट्रोविमॅबचा प्रीक्लिनिकल डेटा ओमिक्रॉनसह कोरोनाच्या इतर अनेक प्रकारांविरूद्ध खूप प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे.

या औषधांच्या परिणामांची पुष्टी करण्यासाठी सोट्रोविमॅब थेरपीवर पुढील चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र सध्या तरी या क्षणी हे औषधाकडे एक मोठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे.

ओमायक्रोनवर प्रभावी

कंपनीने दावा केला आहे की, औषध सोट्रोविमॅबने ओमायक्रॉन 37 म्यूटेशनविरुद्ध प्रभावीपणे काम करते. गेल्या आठवड्यात देखील, प्री-क्लिनिकल चाचण्यांनंतर, असं सांगण्यात आलं होतं की, सोट्रोविमॅब हे औषध ओमायक्रॉनच्या विरूद्ध कार्य करतं. हे औषध WHO ने देखील नमूद केलेल्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावीपणे कार्य करेल असंही कंपनीने म्हटलंय.

मृत्यूदर कमी होण्यास मदत

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असंही सांगण्यात आलं आहे की, कोरोनाची लागण झालेल्या मध्यम ते उच्च पातळीवरील संक्रमित लोकांचा रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका या औषधामुळे 80 टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो.