तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो का? मग तुमच्या रोजच्या 'या' 9 सवयी असू शकतात त्यासाठी कारणीभूत

आज आम्ही तुम्हाला अशा 9 सवयींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्हाला बदलण्याची गरज आहे.

Updated: May 10, 2022, 10:44 PM IST
तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो का? मग तुमच्या रोजच्या 'या' 9 सवयी असू शकतात त्यासाठी कारणीभूत title=

मुंबई : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात, लोकांना स्वत:साठी थोडाही वेळ मिळत नाही. त्यात जेव्हाही त्यांना वेळ मिळते तेव्हा ते अंथरुनातच असतात. कारण त्यांना तेथून उठण्याचं मन होत नाही. जर तुम्ही अशा परिस्थितीचा सामना करत असाल, तर तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष देणं जास्त महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 9 सवयींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्हाला बदलण्याची गरज आहे. कारण तुमच्या याच सवयींमुळे तुम्हला नेहमी थकवा जाणवतो आणि काहीही काम करु नये असे वाटते.

1. नियमित व्यायाम न करणे
2.  नाश्ता न करण्याची सवय थकवा वाढवण्याचे काम करते.
3. तुम्ही फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे किंवा जास्त मसालेदार जेवण खाणे
4. पाणी कमी पिणे
5. नकळत भीतीने घेरले जाणे, म्हणजे सतत कोणत्याही गोष्टींचा विचार करणे
6. जास्त प्रमाणात मद्य सेवन करणे
7. कोणत्याही कामासाठी 'नाही' म्हणणे माहित नाही. ज्यामुळे एक्ट्रा काम करावं लागतं
8. मोबाईल रात्री झोपेपर्यंत वापरणे... जर तुम्ही असे करत असाल तर, त्याचा प्रकाश आणि झोपण्यापूर्वी त्यात वाचलेल्या किंवा दिसलेल्या गोष्टी तुमच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतात.
9. तुमच्या साप्ताहिक सुट्टी आणि सुट्टीच्या दिवसातही काम करणे.

जर तुम्ही देखील आयुष्यात या गोष्टींने घेरलेले असाल, तर थकवा आयुष्यात कधीही तुमची साथ सोडणार नाही. तुम्हाला स्वतःसाठी काही सीमा निश्चित कराव्या लागतील. तुम्हाला वेळ मर्यादा देखील सेट करावी लागेल. याशिवाय तुमचा आहार आणि फिटनेस पहिल्या क्रमांकावर ठेवण्यावर भर द्यावा लागेल. ज्यानंतरच तुमचा थकवा दूर होऊ शकतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)