मुंबई : तुम्ही कोव्हिड व्हॅक्सीनविषयी काही बातम्या वाचत असाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडत असेल. पण आतापर्यंत कुठेही व्हॅक्सीन सक्तीचे केलेले नाही. पण लोकांना व्हॅक्सीन घेण्याचा सल्ला दिला जातो. फक्त आरोग्याशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी व्हॅक्सीन घेण्याचा सल्ला दिला जात नाही. यासाठी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तरी चालेल.
सीडीसीच्या म्हणण्यानुसार ही लस फक्त कोव्हिड -19 पासूनच संरक्षण देत नाही, तर इतरांचेही संरक्षण करते. तसेच सीडीसी या महामारीच्या रोगातून मुक्त होण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे हे लसीकरण आहे असे मानते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कमीत कमी 65-70 टक्के लोकांना संसर्ग रोखण्यासाठी लस देण्याची गरज आहे, याचा अर्थ असा की अधिक लोकांना लस देण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल.
कोरोना लस कमी वेळेत शोधली गेली तरी देखील...
असे बरेच लोक आहेत, ज्यांना कोव्हिड लस तयार करण्याच्या गतीबद्दल शंका आहे. हे खरं आहे की शास्त्रज्ञ लसी विकसित करण्यासाठी किंवा एखादा शोध लावण्यासाठी वर्षानुवर्ष घालवतात. परंतु कोरोना साथीच्या रोगाचा उपाय शोधण्यासाठी वेग वाढवला गेला आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना शास्त्रज्ञ, व्यवसाय आणि आरोग्य संस्था यांच्या सोबत मिळून काम करत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर, कोट्यवधी लोकांच्या लसीकरणामुळे कोव्हिड -19 चा प्रसार रोखला जाईल आणि जग प्रतिकारशक्तीकडे जाईल. तज्ञ म्हणतात की केवळ चांगल्या रोग प्रतिकारशक्तीमुळेच जग, आपल्या सामान्य आणि पूर्ववत जीवनात परत येऊ शकेल.