मुंबई : हृदयविकाराच्या प्रकरणांमध्ये, असं दिसून आलंय की, बहुतेक हृदयविकाराचा झटका सकाळी येतो. याबद्दल स्पेनमध्ये एक संशोधन करण्यात आलं आणि या संशोधनात असं दिसून आलं की, बहुतेक हृदयविकाराचा झटका सकाळी येतो आणि ते खूप गंभीर असू शकतात. संशोधनानुसार, सकाळी 6 आणि ते दुपारच्या दरम्यान होणारं हृदयविकाराचे सर्वाधिक नुकसानदायक असतो.
हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ज्या लोकांना सकाळी हृदयविकाराचा झटका येतो, त्यांना त्याचे गंभीर परिणाम दिसून येतो.
सकाळी 6 ते दुपारपर्यंत येणारा हृदयविकाराचा सर्वात धोकादायक असतो. तज्ज्ञांच्या मते, जर यावेळी हृदयविकाराचा झटका आला तर त्यातील सुमारे 20 टक्के भाग डेड टिशुमध्ये बदलला जाचो. त्याचा सर्वाधिक परिणाम त्या व्यक्तीवर होतो. दिवसाच्या इतर कोणत्याही वेळी हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा हे क्वचितच घडतं.
तज्ज्ञांच्या मते, तुमच्या 24 तासांच्या बॉडी क्लॉकचा परिणाम अनेक हृदय रक्तवाहिन्यासंबंधी शारीरिक प्रक्रियेवर होतो. हृदयविकाराचा झटका देखील त्यापैकी एक आहे. हे बहुतेक वेळा घडतं जेव्हा एखादी व्यक्ती झोपेतून उठते.