Cooking in perfect utensils: चांगल्या आरोग्याचा आणि जीवनशैलीचा महामार्ग स्वयंपाकघरातून आणि पर्यायी तुमच्या स्वयंपाकातून जात असतो. दिवसभराचा कामाचा व्याप, त्यातून असणारी आव्हानं या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी चांगलं जेवण जेवणं हा सर्वोत्तम आणि तितकाच फायद्याचा पर्याय ठरतो. आता या चांगल्या जेवणाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी. कारण, प्रत्येत जण आपआपल्या परीनं शक्य असेल त्या सुविधामध्ये अन्नपदार्थ तयार करुन ते खाण्याला प्राधान्य देतो. या साऱ्यामध्ये एक बाब अतिशय महत्त्वाची ती म्हणजे अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी. कारण, बऱ्याचदा भांड्यांमध्ये असणारे घटक पदार्थांची चव वाढवण्यासोबच त्यांच्यातील पोषक तत्त्वांमध्येही भर टाकत असतात.
सहसा जेवण शिजवताना स्टील, Aluminum किंवा तत्सम भांड्यांचा वापर केला जातो. पण, या भांड्यांमध्ये पदार्थ शिजवणं खरंच योग्य आहे का? तुम्ही काही चुका तर करत नाही आहात ना? हे एकदा जाणून घ्या...
स्टेनलेस स्टीलची भांडी (Stainless Steel)- स्टीलची भांडी अतिशय सोप्या पद्धतीनं उपलब्ध होतात. वापरण्यास सोपी असतात आणि किफायतशीरही असतात. पण, यामध्ये अन्न शिजताना त्यातील 60 ते 70 टक्के पोषक घटकच अस्तित्वात राहतात. बाजारात लगेचच नजरेत भरणारी क्रोमियम प्लेटेड स्टीलची भांडी तर कधीच खरेदी करु नका, त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होतो.
पितळेची भांडी (Brass)- पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी बरीच मेहनत लागते. यामध्ये तुम्ही आंबट पदार्थ शिजवू शकत नाही. असं असलं तरीही अशा भांड्यात शिजवलेल्या अन्नामध्ये 90 टक्के पोषक घटक टिकून राहतात.
कांस्याची भांडी (Bronze)- कांस्याच्या भांड्यामध्ये पदार्थांमधील जवळपास 95 टक्क्यांहून अधिक पोषक घटक कायम राहतात. पण, अशी भांडी घेतानाही त्यावर टीन किंवा क्रोमियम कोटींग असल्यास त्यांना पसंती देणं टाळा.
सिरॅमकची भांडी (Ceramic) - सिरॅमिकची हलक्या दर्जाची भांडी स्वयंपाकासाठी न वापरणं फायद्याचं, कारण त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. जर तुम्ही सिरॅमिकची भांडी वापरतच असाल तर ती चांगल्या दर्जाची असतील यावर लक्ष द्या.
Aluminum ची भांडी – आतापर्यंत अनेकांच्याच घरात Aluminum च्या भांड्यांमध्ये जेवण होत असेल. पण, thyrotoxic म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या या भांड्यांचा वापर प्रचंड घातक ठरतो. अपचन, अर्धांगवायू आणि मेंदूशी संबंधित अनेक समस्या या भांड्याच्या वापरामुळे उदभवू शकतात.
नॉनस्टीक भांडी (Non Stick) - हल्ली प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या प्रकारच्या भांड्यांमध्ये Teflon चा कोच अर्थात आवरण असतं. ज्यामुळं कॅन्सरसारखे आजार उदभवू शकतात. याशिवाय हृदयरोग, मानसिक आजार, किडनी आणि यकृताचे विकारही नॉन स्टीक भांड्यांच्या वापरामुळे बळावू शकतात.
थोडक्यात धातूच्या भांड्यांवर असणारे विविध कोट दिसायला कितीही सुरेख असले, त्यांच्यामध्ये अन्नपदार्थ करपत नसले तरीही ते आरोग्यास मात्र हानी पोहोचवतात. परिणामी बीडाचा तवा, टोप अशी भांडी दीर्घकाळ वापरण्यासाठी उत्तम पर्याय. यामुळं आरोग्याला हानीही पोहोचल नाही आणि शरीराला आवश्यक त्या घटकांची पूर्तताही होते. मातीची भांडीही यामध्ये एक चांगला पर्याय ठरतात.