मुंबई : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे शरीराचं वाढतं वजन ही लोकांसाठी एक सामान्य समस्या बनतेय. या वाढत्या वजनामुळे साखर, उच्च रक्तदाब, दमा आणि मधुमेह तसंच हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही लठ्ठपणाशी झुंजत असाल तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. जर तुम्ही व्यायामासाठी वेळ काढू शकत नसाल तर आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात असलेल्या जिऱ्याशी संबंधित काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही वाढत्या वजनापासून सुटका मिळवू शकता.
प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या जिऱ्यामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅंगनीज आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही दररोज पाण्यात जिरं मिसळून प्यायलात तर ते शरीरात चरबी जमा होऊ देत नाही आणि वजन वाढण्यास प्रतिबंध करते. तुम्ही 2 चमचे जिरं एका ग्लास पाण्यात टाका आणि नंतर रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर वजन कमी करण्यासाठी जीऱ्याचं पाणी उकळून प्या.
कढीपत्ता आणि जिऱ्याचं पाणी यांचं मिश्रण वजन कमी करण्यासाठी देखील चांगलं मानलं जातं. ते वापरण्यासाठी रात्री एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात 1 चमचे जिरं आणि 7 धुतलेले कढीपत्ता मिसळा. सकाळी उठल्यावर ते पाणी चाळणीने गाळून प्या. असं मानलं जातं की, हे पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय गती वाढते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते.
जिरे आणि धण्याचं पाणी चवीला उत्तम असतंत शिवाय ते वजनही नियंत्रणात ठेवतं. जर तुम्हाला ते वापरायचे असेल तर एक ग्लास पाण्यात धणे आणि जिरे मिसळा. सकाळी उठल्यावर ते पाणी गाळून प्या. या उपायाने लठ्ठपणा तर कमी होतोच पण जास्त वेळ भूकही लागत नाही.
जिऱ्यासोबत लिंबू पाणी पिणं हा देखील वजन कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. ते वापरण्यासाठी तुम्ही एका ग्लास पाण्यात २ चमचं जिरं टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर चांगले उकळा. यानंतर ते गाळून थंड करून त्यात लिंबाचा रस मिसळून प्या. वाढत्या वजनाच्या समस्येपासून आराम मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची खातरजमा करत नाही.)