मुंबई : गर्भपात झाल्यानंतर महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. दरम्यान गर्भपातानंतर येणाऱ्या पिरीयड्स संदर्भात अनेक महिला चिंतीत असतात. गर्भपातानंतर मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होईल यामुळे बहुतेक स्त्रिया चिंतेत असतात. तसंच गर्भपातानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्यास, महिलेला पोटाच्या खालच्या भागात जास्त अधिक वेदना होण्याची शक्यता असते.
वैद्यकीय गर्भपातानंतर सामान्य पिरियड्स सुरू होण्याची कोणतीही निश्चित वेळ नाहीये. गर्भपातानंतर 4 ते 8 आठवड्यादरम्यान कधीही मासिक पाळी सुरू होऊ शकते.
जर गर्भपात शस्त्रक्रियेने झाला असेल तर पिरीयड्स येण्यास 4 ते 6 आठवडे लागू शकतात. गर्भधारणेप्रमाणे गर्भपाताचा टप्पा प्रत्येक महिलेसाठी सारखा नसतो. अशा परिस्थितीत 8 आठवड्यांनंतरही पिरीययड्स सामान्यपणे येत नसेल तर यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
दुसरीकडे जक गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत गर्भपात झाल्यास 4 ते 8 आठवड्यांमध्ये मासिक पाळी येण्याची शक्यता जास्त असते.
गर्भपातानंतर येणाऱ्या मासिक पाळीचा काळ प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. साधारणतः 4-7 दिवसांत पिरीयड्स निघून जाण्याची शक्यता असते. मात्र याची अचूक वेळ निश्चित करणं कठीण आहे. प्रत्येक महिलेच्या परिस्थितीत याचा काळ वेगळा असू शकतो.