Good Habits : तरुणपणातच स्वतःला लावा या 9 सवयी.. पूर्ण जग तुमच्यामागे धावेल..

तुम्ही वयाच्या तिशीपर्यंत खालील गोष्टींचं पालन केल्यास तुमचा आत्मविश्वास (Confidence) तर वाढेलच, सोबत तुम्ही इतरांनाही प्रोत्साहित (Motivate) करू शकाल.

Updated: Sep 27, 2022, 04:45 PM IST
Good Habits : तरुणपणातच स्वतःला लावा या 9 सवयी.. पूर्ण जग तुमच्यामागे धावेल.. title=
what to do before you are 30 NZ

9 Things to Do Before You Turn 30: सर्वसाधारणपणे असा समज असतो  की, वयाची 30 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मुलगा किंवा मुलगी आयुष्यात सेटल (Settle) असावीत. याबाबत अनेकांचे वेगवेगळे विचार असू शकतात. तसं झाल्यास आयुष्यातील पुढील टप्पा तुलनात्मकरित्या सहज होऊ शकतो. अशात आयुष्याचा बेस तयार करण्यासाठी तुम्हाला काही चांगल्या सवयी असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही वयाच्या तिशीपर्यंत खालील गोष्टींचं पालन केल्यास तुमचा आत्मविश्वास (Confidence) तर वाढेलच, सोबत तुम्ही इतरांनाही प्रोत्साहित (Motivate) करू शकाल. (what to do before you are 30 NZ)

1. भरपूर वाचा (Read a Lot)
'वाचाल तर वाचाल' हे विधान आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. वाचन खूप महत्त्वाचे आहे. वाचनामुळे आयुष्यात काही गोष्टींचे निर्णय घेताना याचा फायदा होतो.

2. चौकटीच्या बाहेरचा विचार करा (Be Different)
इतरांपेक्षा वेगळं दिसण्यात वेळ वाया घालवू नका. इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी स्वत:मध्ये योग्य ते बदल करा. तुम्ही कौशल्यपूर्ण असाल यावर भर दिल्यास तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल.

3. मर मर काम करा (die for Work)
कोणत्याही कामात झोकून काम करायची तयारी दाखवा. काम करताना परिणामांचा विचार करत बसू नका. मरेपर्यंत काम करण्याची क्षमता ठेवा.

4. निरोगी खाणे सुरू करा (Start Eating Healthy)
या वयात निरोगी खाण्यावर भर द्या. दारु सिगारेट सारख्या विषाला बळी पडू नका. तुम्ही जर निरोगी असाल तर तुम्ही या जगात वाटेल ते करु शकता. स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य द्या.

आणखी वाचा... Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या 5 खूप महत्त्वाच्या टिप्स

5. अधिक निरीक्षण करा (Be More Observing)

आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करा. त्यातून योग्य आणि अयोग्य काय आहे याचा विचार करा त्यातून जितक्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील तितक्या शिकून घ्या. 

6. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा (Become Financially Independent) 
जितकं लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जेव्हा तुम्ही कोणावर अवलंबून असता तेव्हा तुम्ही स्वत:ला कमजोर समजता. आणि त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर फरक दिसू लागतो.

7. उत्कृष्ट संप्रेषण कौशल्ये विकसित करा (Develop Excellent Communication skills)
संवाद साधल्याने बऱ्याच गोष्टी सुटतात. पण त्यासाठी उत्तम संवाद कौशल्ये असली पाहिजेत. त्यासाठी तुमच्या संवादावर चांगलाच अभ्यास असला पाहिजे कंमाड असली पाहिजे. देवाने तोंड दिलं आहे म्हणून काहीही बोलून चालणार नाही. अशाने जवळच्या व्यक्तींना हरवून बसाल.

8. उत्पन्नाचे अनेक प्रवाह विकसित करा (Develop Multiple Streams Of Income)
या वयात हळूहळू गरजा आणि जवाबदाऱ्या वाढू वागतात. त्यामुळे एका ठिकाणांहून आलेले पैसे त्यासाठी अपूरे असतात. मग अशावेळेस तुमच्याजवळ अनेक इनकम सोर्स असल्यास त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होतो.

आणखी वाचा...  Relationship tips: तुम्ही डेटला गेल्यावर या चुका करता का? चुका टाळण्याच्या सिक्रेट टिप्स

9. जास्तीत जास्त प्रवास करा, पण गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा (Travel as much as possible, but keep money for investment)

या वयात जितकं होईल तितकं जग फिरुन घ्या. कदाचित नंतर येणाऱ्या जवाबदाऱ्यांमुळे जग फिरणे अवघड होईल. पण जग फिरताना पैशांची उधळपट्टी होणार नाही याची देखील काळजी घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)