Fertility Boosting: मुळा आणि फर्टिलिटीचा काय संबंध? जाणून एका क्लिकवर

ऑफिसमधील कामाचा ताण (Work stress in the office) आणि घरातील अनेक समस्या यामुळे तरुण-तरुणी अनेक वेळा ताणतणावात दिसतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला दिला घेतला जातो. पण भाजी-फळ्यांमध्ये काही पदार्थ असे असतात ज्यांना फर्टिलिटी बूस्टिंग (Fertility Boosting) म्हणून ओळखलं जातं. 

Updated: Sep 27, 2022, 03:24 PM IST
Fertility Boosting: मुळा आणि फर्टिलिटीचा काय संबंध? जाणून एका क्लिकवर title=
What is the connection between Radish and Fertility and Fertility Boosting food Radish nm

Fertility Boosting: नवरा-बायको (husband and wife) हे दोघेही आता कामावर जातात. स्पर्धेच्या युगात तरुण-तरुणीचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. धावपळीचं जग, त्यात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप यामुळे अनेक जोडप्यांमध्ये प्रजनन क्षमतेची समस्या अधिक दिसून येतं आहे. 

ऑफिसमधील कामाचा ताण (Work stress in the office) आणि घरातील अनेक समस्या यामुळे तरुण-तरुणी अनेक वेळा ताणतणावात दिसतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला दिला घेतला जातो. पण भाजी-फळ्यांमध्ये काही पदार्थ असे असतात ज्यांना फर्टिलिटी बूस्टिंग (Fertility Boosting) म्हणून ओळखलं जातं. (What is the connection between Radish and Fertility and Fertility Boosting food Radish nm)

यात पहिलं नाव येतं मुळ्याचं...बारा महिने मिळणाऱ्या मुळामध्ये अत्यंत गुणकारी गोष्टी आहे. मुळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) चांगली राहते. सर्दी आणि खोकल्याची समस्या (Cold and cough problem) दूर होते. दुसरीकडे प्रजनन क्षमता वाढण्यासाठी मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मुळा खरंच प्रजनन क्षमता वाढवण्यात मदत करतो का? असा प्रश्न निर्माण होतो. 

मुळा आणि फर्टिलिटीचा काय संबंध? (What is the connection between Radish and Fertility?)

मुळा हा एक प्रकारची कंद भाजी आहे. मुळा रंगाने पांढरा आणि चवीला तिखट आणि उग्र वास असतो. हा मुळा औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. मुळा पचनासाठी उपयुक्त असून गॅस कमी करण्यास मदत करतो. मूळव्याध कमी करण्यासही मुळा फायदेशीर ठरतो. मुळ्यात बी-6 जीवनसत्त्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे. 

मुळा खाल्ल्याने महिला आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व किंवा वंध्यत्वाची समस्या कमी होते, असा दावा केला जातो. मात्र अजूनही यावर ठोस असं उत्तर नाही. नपुंसकत्वावर घरगुती उपाय म्हणून मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. रोज मुळा खाल्ल्याने प्रजनन क्षमता वाढते असेही म्हणतात. मुळ्याव्यतिरिक्त, मुळ्याच्या बिया देखील प्रजननक्षम अन्न असल्याचे म्हटले जाते. महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी येण्यासारख्या समस्यांमुळे त्यांना गर्भधारणेतही समस्या येतात. त्यामुळे मुळा फायदेशीर असल्याचे सांगण्यात येते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)