मुंबई : भारतात सापांच्या सुमारे 236 प्रजाती आहेत. मात्र, यातील बहुतांश साप विषारी नाहीत. सर्वच साप धोकादायक असतात असा सर्वसामान्य समज आहे, परंतु अशा सापांच्या चाव्यामुळे फक्त इजा होते किंवा कमी प्रमाणात त्रास होतो. परंतु आपल्याला साप चावला या विचाराने लोकांच्या मनात भिती उत्पन्न होते. ज्यामुळे त्यांचा घाबरुन मृत्यू होतो. ग्रामीण भागात सापांची संख्या जास्त असल्यामुळे, येथील बऱ्याच लोकांना सर्पदोषाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. साप चावल्यामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले लोक हे ग्रामीण भागातीलच आहेत. परंतु अशी परिस्थीती जेव्हा उद्भवते, तेव्हा घाबरुन न जाता आणि जास्त पॅनिक न होतो लोकांनी शांत राहायला हवं आणि लगेच मेडीकल हेल्पसाठी एमरजेंसी हेल्पलाईनवरती कॉल करायला हवं.
अशा अपघातांच्या वेळी काय करावे आणि काय करू नये हे बहुतेक लोकांना माहिती नसतं. ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा वेळी काय करावं हे लोकांना जाणून घेणं फार महत्वाचे आहे.
- सर्व प्रथम, आपण शहरात असल्यास, ताबडतोब रुग्णवाहिकेला कॉल करा.
- घाबरण्याऐवजी, ज्याच्यावरती दंश झाला आहे त्याने शांत रहावे, कारण घाबरल्याने तुमच्या हृदयाची गती वाढते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होऊ लागतो आणि विष शरीरात वेगाने पसरते.
- जिथे साप चावला आहे ती, जागा स्वच्छ करावी, परंतु लक्षात ठेवा की, ती जागा पाण्याने धुऊ नका.
- जखम कोरड्या कापसाने किंवा कपड्याने झाका. परंतु तो कपडा साफ आणि स्वच्छ असावा याची काळजी घ्या.
- सापाने चावल्यामुळे अंगावरती सूज येण्यापूर्वी त्या दागिने आणि घट्ट कपडे काढून टाका.
- जखमेवर बर्फ लावू नये. जखमेला खरवडून काढू नये किंवा तोंडातून विष काढण्याचा प्रयत्न करू नये.
- तसेच डॉक्टर किंवा तज्ञांच्या सूचनेशिवाय दंश झालेल्या व्यक्तीला औषधे देऊ नयेत.
- या काळात कॅफिन किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये, कारण असं केल्याने तुमचे शरीर विष शोषून घेते.
- साप चावलेल्या व्यक्तीला अजिबात उचलू नका. त्या व्यक्तीला झोपून राहू दे
- साप चावल्यानंतर लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका, ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
- जखम कधीही चाकूने कापू नका. यामुळे तुमची समस्या वाढू शकते
- बरेच लोक साप चावल्यानंतर विष शोषण्याचा प्रयत्न करतात, तथापि, असे कधीही करू नये.
देशात विषारी सापांच्या 13 प्रजाती आहेत, त्यापैकी 4 अत्यंत विषारी आहेत - कोब्रा स्नेक, रसेल वाइपर, स्केल्ड वाइपर आणि क्रेट हे सगळ्यात विषारी सापांच्या जाती आहेत. भारतात बहुतेक मृत्यू हे साप किंवा कोब्रा आणि क्रेट चावल्यामुळे होतात.
सर्पदंशावर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार मोफत केले जातात, लोकांमध्येही त्याबाबत जागरुकता कमी आहे. यामुळे लोक अवैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करतात आणि शेवटी पीडिताचा मृत्यू होतो. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.