उन्हाळ्यात तुम्ही देखील थंड पाणी पिणं सुरु केलंय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

थंड पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर कसा परिणाम होतो. हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ शकता. 

Updated: Mar 30, 2022, 05:16 PM IST
उन्हाळ्यात तुम्ही देखील थंड पाणी पिणं सुरु केलंय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय title=

मुंबई :उन्हाळ्यात लोकं उष्णतेने हैराण होतात. ज्यामुळे स्वत:ला शांत करण्यासाठी लोक थंड पाणी पिण्यास सुरूवात करतात. असं केल्याने कोरड्या पडलेल्या घशाला थंडावा मिळतो आणि मन देखील शांत होतं. परंतु तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण उन्हाळ्यात हवंहवंस वाटणारं थंड पाणी तुमच्या शरीराला हानी पोहोचवतं. म्हूणून बऱ्याचदा आपल्या घरातील मोठी माणसं देखील हेच सांगतात की, फ्रीजमधील पाणी पिण्याऐवजी साधं पाणी प्या. परंतु ते म्हणतात ना की, 'दिल है के मानता नही.' तसंच काहीसं उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याच्या बाबतीत होतं. असं केल्यामुळे तुम्ही आजारांना मात्र आमंत्रण देता. चला तर मग जाणून घेऊया की थंड पाणी तुमच्या आरोग्यावर कसं परिणाम करतं.

थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवरही परिणाम होतो

थंड पाणी पिण्याचे अनेक तोटे आहेत. थंड पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. हे तुम्ही एका उदाहरणाने समजून घेऊ शकता. तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुता तेव्हा तुमच्या त्वचेची छिद्रे उघडतात आणि त्वचा सैल होते.

दुसरीकडे, जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुता, तेव्हा तुमची त्वचा घट्ट होते. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही समजू शकता की, जेव्हा तुम्ही थंड पाणी प्याल तेव्हा तुमच्या पोटात कोणत्या प्रकारची समस्या होऊ शकते.

हृदयाची गती कमी होते

याशिवाय एका वैद्यकीय संशोधनानुसार, थंड पाणी तुमच्या हृदयाची गती कमी करू शकते. तैवानच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, थंड पाणी पिणे देखील हृदयासाठी चांगले नाही. त्यामुळे थंड पाण्याचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात.

बद्धकोष्ठतेच्या तक्रारी

थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता देखील होते. अहवालात असे म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर थंड पाणी पितात, तेव्हा अन्न पचणे कठीण होते. अशा स्थितीत तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार उद्भवते.

थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखी

तुम्ही पाहिलेच असेल की, थंड पाणी प्यायल्यानंतर अनेकांना डोकेदुखीची तक्रार सुरू होते. परंतु हे का होतं हे तुम्ही एका उदाहरणाने समजून घेऊ शकता. बर्फ गिळताना अनेकांना त्रास होतो, तसेच कोणाच्या चेहऱ्यावर बर्फ ठेवला, तरी त्यामुळे डोकंदुखू लागतं. त्याच पद्धतीने थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखीची तक्रार वाढते.

खरं तर, हे पाणी संवेदनशील मज्जातंतूंना शांत किंवा सुन्न करतात आणि ते लगेच तुमच्या डोक्याला संदेश पाठवतात, ज्यामुळे डोकेदुखी होते.