Pregnancy मध्ये महिलांनी काय खावे? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला Pregnancy मध्ये महिलांनी कोणता आहार घ्यावा याविषयी सांगणार आहोत.

Updated: Oct 15, 2022, 10:11 PM IST
Pregnancy मध्ये महिलांनी काय खावे? जाणून घ्या  title=
What should women eat in pregnancy find out nz

Pregnant Women : गर्भवती असताना महिलांना अधिकची काळजी घ्यावी लागते. विशेषत: त्यांचा आहार संतुलित असणे खूप गरजेचे आहे. गर्भवती असताना महिलांचा आहार हा हेल्दी असावा. या काळात महिलांना अनेक पोषक त्त्वांची गरज असते.  त्या अवस्थेत अनेक महिलांना खूप टेन्शन असते नेमकं खावं तरी काय? जेणेकरुन बाळ हेल्दी राहील. मग अशावेळेस महिला खर्च करुन डॉक्टरांच्या दवाखान्यात वाऱ्या करु लागतात. तर आज आम्ही तुम्हाला Pregnancy मध्ये महिलांनी कोणता आहार घ्यावा याविषयी सांगणार आहोत. (What should women eat in pregnancy find out nz)

आणखी वाचा - CT Scan नेमक्या कोणत्या आजारात केले जाते? जाणून घ्या

 

Pregnancy दरम्यान महिलांनी काय खावे?

1. Dairy Products

Pregnancy दरम्यान महिलांना Calcium आणि protein ची जास्त गरज भासते अशावेळेस Dairy Products म्हणजेच दूध, दही, पनीर आणि ताक यांचा समावेश तुमच्या आहारात करावा. protein साठी पनीर खूप उपयूक्त असते. डॉक्टर देखील दररोज 100 ग्रॅम पनीर खाण्याचा सल्ला देतात. 

2. अंडे (Egg)

अंड्यामध्ये Proteins, Vitamins आणि Minerals हे सगळे पोषक घटक असतात. म्हणून अंड्याला Complete Food म्हटंले जाते. त्यामुळे एका दिवसात 3 ते 4 अंडी खाल्यास तुम्हाला हे सगळे घटक मिळू शकतात. आपल्या आहारात शक्यतो अंड्याचा समावेश असावा. 

आणखी वाचा - Egg For Weight Loss: अंडी खावून वजन कसं कमी करायचं? जाणून घ्या

3. ड्राय फ्रुट्स

डॉक्टर नेहमीच आहारात काजू, बदाम, अक्रोड, मनुका खाण्याचा सल्ला देतात. कारण यात ही Fats, Proteins, Vitamins आणि Minerals असतात. 

आहाराची काळजी घेणे तर महत्त्वाचे आहेच पण व्यायाम देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थीतीत अधिक काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. शक्यतो सटॉल वरील खाणे टाळा. तुम्ही जितकी स्वत:ची काळजी घ्याल आणि जितका आराम कराल तितकंच तुम्हाला त्याचा फायदा होईल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)