Right way to eat eggs : आयत्यावेळी खायला काय? इथपासून खाण्यासाठीचा शेवटचा पर्याय इथपर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी येऊन थांबतात. ते म्हणजे Eggs. (Breakfast) ब्रेकफास्ट असो, एखादं लाईट सॅलड (Salad) असो किंवा मग केक (Cake) आणि सँडविच (Sandwich) असो त्यामध्ये अंड्याचा वापर केला की समजा त्या पदार्थाची चव वाढलीच. 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे', असं कुणीतरी म्हटलंयते अनेकजण जातीनं पाळताना दिसत आहेत. (what is the right way to eat eggs know more )
अंड्यामध्ये असणारे अनेक पोषक घटक आरोग्यासाठी प्रचंड फायद्याचे ठरतात. पण, अंड्याचा पिवळा भाग खायचा की सफेद (egg whites or yello part), अंड उकडून खायचं की आणखी कोणत्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मिळालीयेत का कधी? तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर जाणून घेऊया त्यासंबंधीचीच माहिती.
तुमच्या आहाराच्या सवयींमध्ये विविध प्रकारचे प्रोटीन्स असतात. शिवाय Vitamin D, Vitamin A, Vitamin B2, Vitamin B12, Folate Iodine यांसारखे घटक असतात.
अंडी शिजवण्याच्या पाच सोप्या पद्धती अवलंबात आणून तुम्ही त्यापासून सहजपणे बरेच मोलाचे घटक शरीराला देऊ शकता.
उकडलेली अंडी- (Boiled Eggs) हार्ड बॉईल्ड अर्थात इंडी पूर्णपणे उकडून त्यापासून प्रोटीन्स आणि लाभदायक फॅट्स मिळवता येतात. पण, तुलनेनं हार्ड बॉईल्ड एग्ज ऐवजी सॉफ्ट बॉईल्ड एग्ज शरीराला जास्त प्रमाणात प्रोटीन्स देतात.
स्क्रॅम्बल्ड एग्स- Scrambled egg हा शब्द किंवा हा पदार्थ तुम्ही अनेक ठिकाणी वाटला आणि ऐकला असेल. ही एक अशी संकल्पना आहे जिथं अंडी मऊसूत आणि चवदार स्वरुपात खाता येतात. यासाठी दोन अंडी आणि 1 कप दूध पॅनमध्ये मंद आचेवर शिजवावं. हे मिश्रण घट्ट होत असल्याचं लक्षात येताच त्यामध्ये मीठ आणि आवडीनुसार मीरपूड टाकून ते सर्व्ह करावं.
Fried Eggs - कमी वेळात सर्वात सोपा आणि पोट भरता येणारा खाद्यप्रकार म्हणजे फ्राईड एग्स. हाफ फ्राय किंवा सनी साईड अप हे त्याचेच काही प्रकार. मीठ न वापरता सनी साईड अप तयार केल्यास ते शरीराराठी पोषक ठरतं. ज्यांना मीठाची गरज वाटतेच त्यांनी ते कमी प्रमाणात वापरावं.
पोच्ड एग्स- (Poached eggs) उकळत्या पाण्यात एका चमच्यानं वर्तुळाकार गतीच्या मदतीनं एक भोवरा तयार करावा आणि त्यामध्ये अंड फोडावं. पाण्याच्या गतीप्रमाणं अंड फिरतं आणि एक पांढरा गोळा डोळ्यासमोर तयार होतो. अगदी अलगदपणे हा गोळा झाऱ्याच्या मदतीनं पाण्याबाहेर काढावा.
आवडीनुसार त्यावर चिली ऑईल, मीठ, मीरपूड टाकून अनोख्या पद्धतीनं तयार केलेलं अंड खावं. यामध्ये तुम्हाला एका अंड्यातून 13 ग्रॅम प्रोटीन मिळतं.
ऑम्लेट- आता तुम्ही म्हणाल की त्यात नवं काय? कारण (Omelette) ऑम्लेट तर सर्वजण खातात. पण, ते तयार करताना त्यामध्ये भाज्या, पालक, चीज असे पदार्थ मिसळल्यास अंड्यासोबतच इतरही गोष्टींचे पोषक घटक तुमच्या शरीराला मिळतात. अंड फेटताना त्यामध्ये दूध मिसळणं चव वाढवण्यासोबतच शरीरासाठीही फायद्याचं ठरतं.