Asian Tiger Mosquito: सध्या पावसाचे दिवस सुरु असून घाण, साचलेल्या पाण्यांवर बसणाऱ्या डासांमुळे पसरणारे आजार वाढत आहेत. यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान एशियन टायगर मच्छरचा साऱ्यांनी धसका घेतला आहे. त्याला एडीस अल्बोपिक्टस असेही म्हणतात. इतर डास आणि एशियन टायगर मच्छर माणसांसाठी त्रासदायक असले तरी दोघांमध्ये अनेक फरक आहेत. इतर डास सहसा रात्रीचे चावतात. पण एशियन टायगर मच्छर दिवसा तसेच रात्रीही चावतात. तसेच डास लोकांचे रक्त पितात. तर एशियन टायगर मच्छार हे माणसांसोबत प्राण्यांचे रक्तही पितात. त्यामुळे त्यांना जंगल डास असेही म्हणतात. एशियन टायगर मच्छरचे मूळ दक्षिण पूर्व आशियातील आहे. पण आता हे मच्छर युरोपियन देशांव्यतिरिक्त अमेरिकेतही पसरले आहेत.
एडिस इजिप्ती डासाच्या चाव्यामुळे डेंग्यू होतो. पण एडिस अल्बोपिक्टसमुळेही भारतात डेंग्यू होतो. हा रोगाचा प्रसार विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त आहे. यामुळे डेंग्यू शॉक सिंड्रोम होतो. या आजारात रक्तस्त्राव, मेटाबॉलिक अॅसिडोसिस यासारखी लक्षणे दिसतात.
चिकनगुनिया आजार होण्याचे एडिस इजिप्ती हेदेखील एक कारण आहे. तसेच एडिस अल्बोपिक्टसमुळे देखील चिकनगुनिया होतो. तो डेंग्यूइतरा गंभीर नसला तरी त्यामध्ये सांधेदुखी, ताप, अशक्तपणा जाणवतो.
आईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात 'ही' लक्षणे
भारतात आढळणाऱ्या एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांमुळे झिका विषाणू पसरतो. नंतर लैंगिक संबंधातून त्याचा प्रसार सुरू होतो. जर गर्भवती महिलेला या विषाणूची लागण झाली तर जन्मलेल्या मुलाच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही.
हा रोग एडिस अल्बोपिक्टसमुळे देखील होतो. यामध्ये तापासोबत डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या होणे, पुरळ उठणे ही लक्षणे दिसतात. या आजाराचा थेट परिणाम मेंदूवर होतो. थकवा, चक्कर येणे, स्थानिक पॅरेस्थेसिया यांसारखी लक्षणे यादरम्यान दिसून येतात.
मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक
हा आजार माणसांपेक्षा घोड्यांमध्ये जास्त आढळतो. डासाच्या चाव्यामुळे हा आजार होतो. अनेक वेळा हा आजार जीवघेणा ठरतो. यामध्ये ताप, डोकेदुखी, लूज मोशन त्यानंतर जास्त झोप लागणे, मूर्च्छा येणे अशी लक्षणे आढळतात. नंतर ती व्यक्ती पुन्हा शुद्धीत येऊ शकत नाही आणि कोमात जाते. या आजारामुळे रुग्ण 70 टक्क्यांपर्यंत बरा होण्याची शक्यता नसते. केवळ 10 टक्के रुग्ण बरे होऊ शकतात.