काय आहे 'सेप्टिक शॉक'? ज्यामुळे प्रणव मुखर्जींच निधन झाले

'सेप्टिक शॉक'चा सर्वाधिक धोका कोणाला   

Updated: Sep 1, 2020, 08:58 AM IST
काय आहे 'सेप्टिक शॉक'? ज्यामुळे प्रणव मुखर्जींच निधन झाले title=

मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी निधन झालं. फुफ्फुसात संक्रमण झाल्यामुळे ते 'सेप्टिक शॉक'मध्ये होते. यामुळेच त्यांच स्वास्थ बिघडलं आणि प्रकृती खालावली. 'सेप्टिक शॉक' ही एक गंभीर स्थिती आहे. यामुळे शरीरातील रक्तस्त्रावावर परिणाम होतो. 

कोणत्या पद्धतीचे बॅक्टेरियल, फंगल आणि व्हायरलमुळे 'सेप्टिक शॉक' होऊ शकतो. याच्यावर उपचार केले नाहीत तर हा आजार वाढू शकतो. सामान्यपणे इन्फेक्शन झाल्यास प्रतिकारक्षमता तयार होते. इन्फेक्शन वेगाने पसरलं तर प्रतिकारक्षमाताही वेगाने काम करते आणि इन्फेक्शनशी जास्त क्षमतेने लढायला सुरू करते. याचाच शरीराला धक्का बसतो आणि 'सेप्टिक शॉक'ची परिस्थिती निर्माण होते. यामुळे अंतर्गत अवयव बंद पडणे अशी स्थिती ओढावते. 

'सेप्टिक शॉक'चा सर्वाधिक धोका कोणाला 

सेप्टिक शॉकचा ज्येष्ठ व्यक्तींना आणि कमी वयाच्या मुलांना त्रास होतो. याला कारण मात्र वेगळी आहेत. गर्भवती असणं, काही आजार असणे, मधुमेह आणि किडनी, फुफ्फुसाचे आजार असणं. कॅन्सर, रोगप्रतिकारकशक्ती कमी असणं यासारख्या आजारांमुळे 'सेप्टिक शॉक'चा धोका अधिक आहे. 

सेप्सिकची ज्येष्ठांमध्ये आढळणारी लक्षणं - 

1)बोलताना अडखळणं

2)फार थंडी वाजणं, स्नायू दुखणं

3)दिवसभरात लघवी न होणं

4)हृदयाचे ठोके वेगाने पडणं

5)शरीराचे तापमान वाढणं किंवा कमी होणं

सेप्सिकची लहान मुलांमध्ये दिसलेली लक्षणं

1)त्वचेचा रंग बदलणं, लाल-जांभळे ठिपके दिसणं

2)अत्यंत आळस येणं, अंथरुणातून उठावेसे न वाटणं

3)त्वचेला हात लावल्यावर एकदम थंड पडल्याचं जाणवणं

4)श्वास वेगाने सुरू होणं

5)पुरळ येणं

6)स्नायू सतत आंकुचन आणि प्रसरण पावणं