डोकेदुखी अन् तापात चुकूनही करु नका किस; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

Kissing Disease: किसिंग डिसीज नाव ऐकून हैराण झालात. पण खरंच किस करण्याचेही काही साइट इफेक्ट असतात. जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: May 29, 2023, 07:53 PM IST
डोकेदुखी अन् तापात चुकूनही करु नका किस; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार title=
What is kissing disease know the symptoms and the infection

What Is Kissing Disease: आत्तापर्यंत तुम्ही किस (Kiss) करण्याच्या फायद्यांबद्दल ऐकलं असेलच. पण तुम्हाला हे माहितीये का किस करण्याचे काही साइट इफेक्टदेखील आहेत. (Side Effect Of Kissing) चुंबन घेतल्याने एक भयंकर इन्फेक्शनही होऊ शकते. याचा ठोस इलाज डॉक्टरांकडेही उपलब्ध नाहीये. त्यामुळं तज्ज्ञही हे लक्षणे दिसताच किस करण्यापासून रोखतात. या आजाराला मोनोन्यूक्लिओसिस (Mononucleosis)  असं म्हणतात. व्हायरल संसर्गातून (Viral Infection) हा आजार होते. या व्हायरसचे नाव एपस्टीन बर्रे असं आहे. हा व्हायरसचे संसर्ग झाल्यास कोणत्याही लक्षणाशिवाय आढळू शकतो. 

किसचे साइट इफेक्ट

हा आजार किस करण्याचा साइड इफेक्टमुळं होऊ शकतो. लाळ, उष्टे पाणी, ज्यूस एकमेकांसोबत शेअर केल्याने होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला या व्हायरसचा संसर्ग झाल्यास त्याच्यामुळं दुसऱ्या व्यक्तीलाही लागण होऊ शकते. तसंच, या व्हायरसचा फैलाव वीर्य किंवा रक्तातूनही होऊ शकतो. 

... तर दिल्ली हत्याकांडातील पीडितेचा जीव वाचवला असता; पोलिसांनी व्यक्त केली हळहळ

किसींग डिसीजची लक्षणे

तज्ज्ञांच्या मते मोनोन्यूक्लिओसिसची काही गंभीर लक्षणे असून शकतात. यामध्ये, थकवा, ताप, गळ्यात खवखव, डोकेदुखी, अंगदुखी, मान आणि काखेत सुज, लिव्हरला सूज त्याचप्रमाणे अंगावर रॅशेस येणे. 

कशी होते तपासणी

डॉक्टर व्यक्तीला जाणवणाऱ्या लक्षणांच्या आधारे किसिंग डिसीजचा निदान करतात. तसंच, त्याची खात्री करण्यासाठी काही चाचण्यांचीही मदत घेतली जाते. जेणेकरुन शरिरात किती प्रमाणात व कोणत्या भागात व्हायरसचा फैलाव झाला आहे, याची माहिती मिळेल. यासाठी ब्लड काउंट आणि अँटीबॉडी टेस्ट केली जाते. 

कसा बचाव कराल

या व्हायरसपासून वाचण्यासाठी एकच उपाय आहे. जर तुमच्या पार्टनरला ताप, गळ्यात खवखव, डोकेदुखी अशी लक्षणे दिसत असतील तर त्याचे चुंबन घेऊ नका. तसंच, या परिस्थितीत तुमच्या जोडीदाराचे उष्ट उन्नदेखील खाऊ नका. 

नाशिकः दार उघडताच समोर दिसले हादरवणारे दृश्य; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच....

आजारावर उपाय नाही

किसिंग डिसीजवर सध्या कोणताही इलाज नाहीये. तसंच, कोणतीही लस सध्या उपलब्ध नाहीये. जर तुम्हाला वरीलपैकी काही लक्षणे दिसत असतील तर वेळेतच सावध होऊन सावधगिरी घ्या. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी किंवा अन्य पेय प्या, भरपूर आराम करा, ताप आणि अंगदुखीवर आराम मिळण्यासाठी औषधे घ्या 

डिस्क्लेमरः हा लेख केवळ सामान्य माहितीवर आधारित आहे. झी २४ तास कोणत्याही प्रकारच्या उपचारांचा दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.