कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आढळणारा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. जो विविध शारीरिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कोलेस्ट्रॉल पातळीतील असंतुलनामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाशी याचा थेट संबंध येतो. या लेखात, कोलेस्टेरॉलची मूलभूत तत्त्वे, त्याचे प्रकार आणि त्याच्या योग्य संतुलनासाठी आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे याविषयीची माहिती स्वतः डॉ. अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांच्याकडून जाणार आहोत.
कोलेस्ट्रॉल हा एक चरबीयुक्त, मेणासारखा पदार्थ आहे जो पेशी पडदा तयार करण्यासाठी, हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि चरबी-विरघळवणारी जीवनसत्त्वे पचवण्यास मदत करतो. कोलेस्ट्रॉलचे दोन मुख्य प्रकार आहेत. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) एलडीएल कोलेस्ट्रॉल, ज्याला बऱ्याचदा "खराब कोलेस्ट्रॉल" म्हटले जाते, जे कोलेस्ट्रॉलला यकृतापासून पेशींपर्यंत वाहून नेते. एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होऊ शकतो. ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तर, एचडीएल कोलेस्ट्रॉल, किंवा "चांगले कोलेस्ट्रॉल," कोलेस्ट्रॉलला पेशींपासून दूर आणि उत्सर्जनासाठी यकृताकडे पाठवते. एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी हृदयरोगाची जोखीम कमी असण्याशी संबंधित आहे.
कोलेस्ट्रॉलची चाचणी किंवा लिपिड पॅनेल ही कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी मोजणारी रक्त चाचणी आहे. हृदयाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी हे महत्वाचे आहे. कारण उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो. प्रौढांनी वयाच्या 20 व्या वर्षी पहिल्यांदा आणि त्यानंतर नियमितपणे ही तपासणी करावी सामान्य पातळी असेल त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार तपासणी करावी.
लठ्ठपणा, मधुमेह किंवा हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास यासारख्या जोखीम घटक असलेल्या व्यक्तींना अधिक वारंवार तपासणीची आवश्यकता असू शकते. कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी निरोगी जीवनशैली यामुळे काही समस्या असल्यास त्याची लवकर माहिती मिळून त्यावर उपाय करता येतात. ज्यामुळे हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो.
रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी प्रति डेसिलीटर (मिलीग्राम/डीएल) मिलीग्राममध्ये मोजली जाते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने कोलेस्ट्रॉलची पातळी 200 मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. एलडीएल आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलमधील संतुलन देखील तितकेच महत्वाचे आहे.
एलडीएल कोलेस्ट्रॉलसाठी, 100 मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी ही पातळी योग्य पातळी मानली जाते. 100 -129 मिलीग्राम/डीएल दरम्यानची पातळी योग्य मानली जाते, तर 130 -159 मिलीग्राम/डीएल बॉर्डर लाइन हाय मानली जाते. 160 मिलीग्राम/डीएल पेक्षा जास्त पातळी असणे म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल असून त्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता असते.
हृदय व रक्तवाहिन्यांच्या संरक्षणासाठी एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी 60 मिलीग्राम/डीएलपेक्षा जास्त ठेवली पाहिजे. 40 -59 मिलीग्राम/डीएल दरम्यानची पातळी स्वीकार्य मानली जाते, तर 40 मिलीग्राम/डीएल पेक्षा खाली असल्यास कमी मानली जाते आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
निरोगी जीवनशैली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नियमित व्यायाम, फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यांनी समृद्ध संतुलित आहार, त्याच बरोबर सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स टाळल्याने कोलेस्टेरॉलची योग्य पातळी राखण्यास मदत मिळू शकते. केवळ जीवनशैलीतील बदल पुरेसे नसल्यास डॉक्टर स्टॅटिनसारखे औषध घेण्याचा सल्ला देतात कोणतीही समस्या लवकर लक्षात येऊन तिच्या योग्य उपचार करण्यासाठी नियमित कोलेस्ट्रॉलची तपासणी आवश्यक आहे. हृदयाचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि हृदय किंवा रक्तवाहिनी संबधित आजारांपासून बचाव करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी समजून घेणे आवश्यक आहे. आरोगयपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करून आणि नियमित तपासणीद्वारे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून, व्यक्ती दीर्घ आणि हृदयाच्या निरोगी आयुष्यासाठी सक्रिय पावले उचलू शकतात. लक्षात ठेवा, ज्ञान ही शक्ती आहे आणि कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत ते निरोगी भविष्याची गुरुकिल्ली असू शकते.