G-Spot म्हणजे काय? महिलांच्या G स्पॉटबद्दल 51% पुरुषांना माहिती नाही

Relationship Tips : स्त्रियांना सेक्सची इच्छा होते का? त्यांना कामोत्तेजनाचा अनुभव येतो का? असे अनेक प्रश्न आजही पुरुषांना पडतात. एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, 51% पुरुषांना महिलांच्या सेक्शुअल प्लेजर स्पॉटबद्दल माहिती नाही. 

Updated: May 7, 2023, 02:23 PM IST
G-Spot म्हणजे काय? महिलांच्या G स्पॉटबद्दल 51% पुरुषांना माहिती नाही title=
what is g spot survey shows that man dont know where is g spot of women and female sexuality

What is G-Spot : वैवाहिक जीवनात प्रेमासोबतच सेक्स लाइफ ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण अशा अनेक घटना ऐकल्या आहेत. जिथे नवरा बायकोमधील सेक्स लाइफ बरोबर नसल्याने घटस्फोट झाले आहेत. अगदी पुरुषांना किंवा महिलांना शारीरिक संबंध ठेवताना ऑर्गेझम मिळाला नाही, म्हणून अनेक जण नाराज असतात. याउपर त्यांची ही भूक मिटविण्यासाठी ते घराबाहेर दुसरं नातं बनवतात. त्यामुळे लग्ना करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला एका डॉक्टरांशी बोलून शारीरिक संबंधबद्दलच्या बारीक गोष्टी समजून घ्यायला हव्यात. 

महिलांच्या त्या स्पॉटबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

महिलांची लैंगिक उत्तेजना याशिवाय ऑर्गेझम हे पुरुषांपेक्षा खूप वेगळं असतं. पुरुषांना कामोत्तेजनाची चिन्ह दिसल्यानंतर त्यांना वीर्यपतन होतं. पण महिलांच्या शरीरात असं काही होतं नाही. स्त्रियांना हे सुख एका भावनेतून प्राप्त होतं. खरं तर अनेक महिला अशा पण आहेत ज्यांना एकाच वेळी मल्टीपल orgasm चा अनुभव मिळतो. (what is g spot survey shows that man dont know where is g spot of women and female sexuality)

एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की,  51% पुरुषांना महिलांच्या सेक्शुअल प्लेजर स्पॉटबद्दल माहिती नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे 50% महिलांनाही त्यांचा जी स्पॉटबद्दल माहिती नाही.  

जी स्पॉट म्हणजे काय?

जी-स्पॉटचा प्रथम उल्लेख हा जर्मनमधील स्त्रीरोगतज्ञ अर्न्स्ट ग्रॅफेनबर्ग यांनी केला होता. जी स्पॉटबद्दल आरोग्यतज्ज्ञांमध्ये मतभेद आढळून आले आहेत. त्यानुसार काही जणांचं म्हणं आहे की, प्रत्येक स्त्रीला जी स्पॉट हा नसतो. याचा अर्थ या स्त्रियांना सेक्समध्ये समाधान मिळणार नाही असं नाही. 

महिलांच्या योनीचा वरच्या भागात एक स्पॉट असतो ज्यामुळे स्त्रियांना लैंगिक उत्तेजनाविषयी प्रेरीत करतो. 

काही तज्ज्ञांच्या मते या स्पॉटवर उत्तेजना ही ऑर्गेझमच्या वेळी अनुभवता येते. 

तर काही जणांचं म्हणं आहे की, लैंगिक क्रियेदरम्यान हा आनंद मिळतो. 

एका तज्ज्ञांच्या मते असं ही सांगण्यात आलं आहे की, महिलांना जर जी स्पॉटवर आनंद मिळण्यास सुरु झाली तर संभोगाच्या वेळी योनीचं दार जास्त मोठं होतं आणि त्यात प्रवेश करणं सोप होतं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)