High Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!

High Cholesterol Control : निरोगी जीवनासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असणे महत्वाचे आहे. पण शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ही बातमी नक्की वाचा... 

श्वेता चव्हाण | Updated: May 7, 2023, 02:22 PM IST
High Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!  title=
High Cholesterol Symptoms and Causes

High Cholesterol Symptoms and Causes : आपल्याला कोणताही आजार झाला असेल तर त्याची लक्षणे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसून येतात. त्याचप्रमाणे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर जास्त लक्षणे किंवा चिन्हे दिसतात. उच्च कोलेस्टेरॉल किंवा हायपरकोलेस्टेरोलेमिया ही स्थिती कोणालाही नवीन नाही. उच्च कोलेस्टेरॉल ही अनेक लोकांसाठी समस्या बनली आहे. कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला एक पदार्थ आहे जो रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो किंवा हृदयविकाराचा धोका कायम असतो. जर तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉल नको असेल तर त्याची लक्षणे कोणती? कोलेस्टेरॉल झाला तर त्यावर कोणते उपाय करणे गरजचे आहे याबाबत जाणून घ्या... 

शरीरातील मेणासारख्या पदार्थाला कोलेस्टेरॉल असे म्हणतात. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असून एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल nआणि एक म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्टेरॉलमुळे शरीरात रक्तप्रवाहाच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच कोलेस्ट्रॉल वाढल्यावर योग्य आहार घेणे आवश्यक आहे. जेव्हा शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा काही पदार्थांपासून दूर राहणे ही तितकेच फायदेशीर ठरू शकतात. 

मेथीची दाणे

मेथी ही अशीच एक भाजी आहे जी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मेथीची पाने आहारातील भाजी म्हणून वापरली जातात, तर बियांचा वापर मसाला म्हणून केला जातो. पण हीच मेथी अतिशय आरोग्यकारी गुणधर्म आहे. या मेथीचे दाणे कसाप्रकारे खावे याबाबत जाणून घ्या..

कच्च्या मेथीचे दाणे कधीही खाऊ नका. हे दाणे कायम भिजवून किंवा भाजून खा. मेथी ही चवीला अत्यंत कडू असून अनेकजण भिजवून त्याचं पाणी पितात. तर काही जण त्याची भाजीही करतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, अँटी-डायबेटिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. मेथीचे दाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल तर कमी होतेच पण वजनही कमी होते.  

जवस 

फ्लेक्ससीड्स हा रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी फारच उपयुक्त आहे. इकोसापेंटायनोइक ऍसिड (EPA) आणि डोकोसाहेक्साएनोइक ऍसिड (DHA) आणि अल्फा लिनोलेनिक ऍसिड हे तिन्ही ऍसिड खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओळखले जातात. म्हणूनच कोलेस्ट्रेरॉलच्या आजारावर जवस हे जादुई औषध आहे. पण जवस किती प्रमाणात खावे याबद्दल जाणून घ्या...

रोजच्या आहारात एक चमचा जवसचा वापर करावा. पण याच्या कच्च्या बिया कधीही खाऊ नका, नेहमी आधी भाजून घ्या मगच खा. त्याचे फायदे मिळविण्यासाठी ते योग्यरित्या खाणे आवश्यक आहे. जवसाच्या बिया भाजून, बारीक करुन, स्मूदी, हलवा, लापशी, लाडू आणि दह्यात मिसळून खाऊ शकता. जवस खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी सहज आणि लवकर कमी करता येते. रोज सकाळी कोमट पाण्यासोबत याचे सेवन करा. 

दालचिनी 

उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दालचिनीचे दररोज सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी सर्वात आधी मसाल्यांचे तुकडे घ्या आणि नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्या आणि काचेच्या डब्यात ठेवा. त्यानंतर दररोज सकाळी उठल्यावर चिमूटभर दालचिनी पावडर खावी. त्याचे फायदे काही दिवसात दिसून येतील. मात्र हे लक्षात ठेवा की जास्त मसाले खाऊ नका, कारण गरम पडल्यास इतर आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)