Signs of Love: प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात परंतु तुम्ही प्रेमात पडलात हे कसं ओळखाल? जाणून घ्या

Symptoms of Love: तुम्ही प्रेमात पडलात की नाही हेच कळतं नाहीये, तुम्हाला एखादी व्यक्ती आवडतेय पण हे प्रेम का निव्वळ आकर्षण? (Signs of True Love) हेही समजतं नाहीये, तेव्हा या लेखातून जाणून घ्या की प्रेमात पडल्याची नक्की लक्षणे कोणती? या लेखातून जाणून घ्या सविस्तरपणे! 

Updated: Apr 24, 2023, 07:52 PM IST
Signs of Love: प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात परंतु तुम्ही प्रेमात पडलात हे कसं ओळखाल? जाणून घ्या  title=
what are the signs of love how you can recognise that you are in love

Signs that You are in Love: प्रेम ही एक अशी भावना आहे जी आपल्याला पटकन व्यक्तही करता येत नाही. प्रेमात आपण खरंच पडलोय की हे फक्त एक (Signs of True Love) आकर्षण आहे याचाही काहीच थांगपत्ता प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सहजा लागत नाही. प्रेमात पडलेली व्यक्ती थोडीशी वेगळी वागायला लागते, बोलायला लागते तिला इतरांचा सहवास नकोसा वाटतो, त्या व्यक्तीला फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीचाच सहवास हवा असतो, फक्त त्याच व्यक्तीचा विचार ती व्यक्ती करत राहते अशी अनेक उदाहरणं प्रेमात पडलेल्या व्यक्तीविषयी देता (What are the symptoms of Falling in Love) येईल आणि हे खरंच आहे म्हणा की, आपल्यालाही अनेकदा याचा तर्क लावताही येत नाही.

प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात त्यातून प्रेम या भावनाबद्दल अनेक जणं (What are the changes we experience when we are in love) कविताही करतात. त्यामुळे प्रेम या भावनेला मानवी आयुष्यात अनन्यसाधारण असे म्हत्त्व आहे. प्रेम हे आंधळं असतं असं आपण म्हणतो परंतु आपण प्रेमात पडलोय हे ओळखायचं तरी कसं? प्रेमात पडलेल्या व्यक्तीला खाणं पिणं सुचतं नाही, त्याला आजूबाजूचे भान राहत नाही त्यातून तो आपल्याच विचारांमध्ये गुरफटून गेलेला असतो असं आपण म्हणतो परंतु तुम्हाला माहितीये का की, प्रेमाची लक्षणं ओळखणंही सोप्पं असते.

त्यातून तुम्हीही सहज सोप्प्या पद्धतीनं तुम्ही खरंच प्रेमात आहात का की फक्त हे आकर्षण आहे हेही तपासून पाहू शकता. तेव्हा चला तर मग या लेखातून जाणून घेऊया प्रेमात पडल्याची लक्षणं आणि नक्की प्रेम आणि आकर्षण यातील फरक काय? (what are the signs of love how you can recognise that you are in love)

1. अनेकदा आकर्षण हे आपल्याला स्वप्नरंजनात घेऊन जाते, त्यातून तुम्हाला जर का एखादी व्यक्ती आवडली असेल अथवा तुम्ही तिच्या प्रेमात पडला असाल तर तुम्ही दिवसाचे 24 तास फक्त त्याच व्यक्तीचा विचार करत राहता तुम्हालाही ती व्यक्ती ही अधिक हवी हवीशी वाटते. त्या व्यक्तीसोबत संवाद साधण्याचा तुम्हीही प्रयत्न करता. 

2. ती व्यक्ती आजूबाजूला जरी दिसली तरी तुमच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमलते आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या आठवणीनंच लाजता. तुमच्या मनात काहीतरी वेगळंच होयला लागतं. ती व्यक्ती समोर दिसली तरी तुम्ही फक्त त्याच व्यक्तीचा विचार करू लागता, तिच्याकडे पाहू लागता आणि ती व्यक्ती जराही जवळ आली तरी तुमच्या छातीत धडधडायला लागते आणि तुमच्या पोटात गोळा येयला लागतो. 

3. तुम्ही त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी जपता आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्पेशल काहीतरी करू लागता. तुम्हाला त्या व्यक्तीची काळजीही वाटू लागते आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही भविष्याचाही विचार करू लागता. 

4. तुम्ही ती व्यक्ती परत कधी भेटले या गोष्टीचाही विचार करू लागता तुम्हाला त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा निर्माण होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)