मुंबई : आल्याचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते. आल्यामध्ये अॅन्टी इंफ्लेमेट्री, अॅन्टी बॅक्टेरियल, अॅन्टी ऑक्सिडेंटशिवाय आणखीही काही पोषक तत्व असतात. आल्यामधील या पोषक तत्त्वांमुळे सूज कमी करण्यास तसेच सर्दी-खोकला कमी करण्यास फायदेशीर ठरते. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी आल्याचं पाणी पिण्याने संपूर्ण दिवस उत्साही, ताजेतवाने राहण्यास मदत होते. आल्याचे पाणी पिण्याने रोगप्रतिकार शक्तीही चांगली होती. पित्त झाल्यासही आल्याचं पाणी पिण्याने आराम मिळतो.
आलं रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन सकाळी उठल्यावर ते पाणी पिल्याने पचनक्रिया उत्तम राहते. अपचन होण्याची समस्या कमी होते. सकाळी उठल्यावर होणाऱ्या सिकनेसची समस्याही दूर होते. तसेच फ्रेश वाटते.
आल्याचं पाणी पिण्याने खाण्याची इच्छा कमी होते. तसेच शरीरात असलेले अधिक फॅट कमी करण्यासही मदत होते. आल्याचं पाणी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात ठेवते.
आल्याच्या पाण्यात अॅन्टीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे केस आणि त्वचेला याचा फायदा होतो. तसेच योग्य प्रमाणात सी व्हिटॅमिन आणि ए व्हिटॅमिनही मिळेत. सी, ए व्हिटॅमिनमुळे केस आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळते.
जे लोक जिममध्ये अधिक व्यायाम, वर्कआऊट करतात त्यांना काही वेळा मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या असते. अशा वेदनेसाठी आल्याचं पाणी पिण्याने ही समस्या सोडवण्यासाठी मदत मिळते.