Weight Loss Drinks: जिममध्ये न जाता Flat Tummy हवाय, रात्री झोपताना 'हे' 2 ड्रिंक्स नक्की प्या

Flat Tummy हवंय? जीममध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरीच 'हे' 2 ड्रिंक्स प्या;  वजन कमी झालंच समजा  

Updated: Sep 5, 2022, 09:28 AM IST
Weight Loss Drinks: जिममध्ये न जाता Flat Tummy हवाय, रात्री झोपताना 'हे' 2 ड्रिंक्स नक्की प्या title=

Weight Loss Drinks: वजन कमी करणं प्रत्येकासाठी एक मोठा टास्क असतो. Belly Fat कमी करण्यासाठी आणि Flat Tummy मिळवण्यासाठी नक्की काय करावं असा प्रश्न फक्त महिलांनाच नाही तर, पुरुषांना देखील पडतो.  Belly Fat कमी करण्यासाठी व्यायाम, जीम अशा पर्यायांचा उपयोग आपण करतो. अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी होत नाही, तर समजून घ्या की दैनंदिन जीवनात आपण काहीतरी चुकीचे करत आहोत. 

जर तुम्ही रात्री पूर्ण किंवा जास्त कॅलरीयुक्त आहार घेतला तर तुम्ही मोठी चूक करत आहात. त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते.  त्यामुळे रात्री झोपण्याआधी काही ड्रिंक्स घेतल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. 

वजन कमी करण्यासाठी रात्री हे पेये प्या
1. हळद दूध - हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात आणि दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते. कारण दूधात सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात. या दोघांचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे रात्री हळदीचे दूध प्यावे.

2. मेथीचा चहा - मेथीच्या चहाचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)