या कारणांमुळे वजन कमी करण्यास कलिंगड फायदेशीर

कलिंगड आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे विटामिन्स, मिनरल्स आणि खूप पोषक तत्वे मिळतात.

Updated: Dec 19, 2019, 06:54 PM IST
या कारणांमुळे वजन कमी करण्यास कलिंगड फायदेशीर title=

मुंबई : कलिंगड आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे विटामिन्स, मिनरल्स आणि खूप पोषक तत्वे मिळतात. हेच कारण आहे की,  कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतो, त्या सोबत उन लागण्यापासून पण वाचवतो. त्यासोबत वजन कमी करण्यासही मदत होते. त्यात असलेले पाणी आणि फायबर पोट भरण्यास मदत करतात, ज्यामुळे डायट कंट्रोलमध्ये राहतो आणि वजन कमी करण्यास ही मदत होते. कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते, जे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतात.

फक्त कलिंगड नाही, तर तर त्यांच्या बिया सुद्धा वजन कमी करण्यास मदत करतात.  कलिंगडच्या बियांमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. 

जे मधुमेहासाठी तर उपयोगी आहेतच, पण वजन कमी करण्यास देखील मदत करतात. बियांमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. जर टरबूजमध्ये ४ ग्रॅम आहे, तर त्यात फक्त २२ कॅलरीज असतात.

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यायाम. पण खूप वेळा व्यायामामुळे मासपेंशीवर जोर येतो आणि मग त्रास होतो. अशात कलिंगड खूप चांगले आहे. 

यात एल-सायट्रिलीन नावाचे एक घटक असतो, ज्याला आपले शरिर एल-आर्जिनिन नावाच्या अमिनो अॅसिडमध्ये बदलते. हे अॅसिड फक्त ब्लड सर्क्युलेशनमध्ये मदत करतं असं नाही, तर रक्त वाहिन्यांना देखील मोकळे करण्यास मदत करते.