धक्कादायक! ढेकूण चावल्यावर होतात मानसिक आजार? वेळीच करा उपाय नाहीतर... 

ढेकूण हा किटक माणसांंचं रक्त पीतो कारण तेच त्यांचं पोषण आहे. 

Updated: Sep 29, 2022, 05:42 PM IST
धक्कादायक! ढेकूण चावल्यावर होतात मानसिक आजार? वेळीच करा उपाय नाहीतर...  title=

Bed Bugs Can Cause Mental Problems: घरात कुठलेही कीटक झाले की आपल्याला त्याचा त्रास होतोच होतो. पण सर्वात जास्त त्रास होतो तो ढेकणांचा. ढेकूण चावल्यामुळे त्वचा जळल्यासारखी वाटते आणि लाल पट्टे उठतात तसेच काही वेळा फोडही येतात याशिवाय कधी- कधी गंभीर एलर्जीही होऊ शकते. (use these tips to control the bed bugs which can cause mental problems see health tips)

ढेकूण हा किटक माणसांंचं रक्त पीतो कारण तेच त्यांचं पोषण आहे. घरात जितकी घाण असेल त्यावरच हे कीटक जगतात. त्यातून ढेकूण हे कुठल्यातरी बारीकश्या जागेत लपून बसतात. त्यामुळे त्यांना शोधणंही असह्य होतं. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंगाला खाज येत असेल आणि बिछान्यावर रक्ताचे थेंब दिसले किंवा दुर्गंधासारखा वास आला तर वेळीच सावध व्हा याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्या घरात ढेकणांचा वावर सुरू झाला आहे.

ढेकूण चावल्याने कोणत्याही प्रकारचा आजार किंवा इन्फेक्शन होत नाही. पण अनेकांच्या मते ढेकूण चावल्यावर मानसिक अडचणींना सामोरं जावं लागतं. यात वाईट स्वप्न पडणं, वेडेपणा, एन्झायटी, ऑबसेसिव्ह बिहेविअर असे मानसिक त्रास होऊ शकतात.

अनेकदा ढेकूण चावल्याने तुम्ही इतके हैराण होता की झोप येत नाही. याचा तुमच्या दिवसभराच्या कामावर परिणाम होतो. ज्यांना ढेकूण चावतात त्यांनी मेंटल डिसॉडरचा उल्लेख केला आहे. 

ढेकूण चावल्यानंतर असा उपाय करा... 
ढेकूण चावल्यानंतर त्वचेवर जळजळ किंवा लाल चट्टे पाहून घाबरून जाऊ नका. अशावेळेस आईस पॅक किंवा अ‍ॅन्टी ईच क्रीम, लोशन मदत करते.  घरात पेस्ट कंट्रोल करा. घरात ओलसरपणा टाळा.  ढेकणांचा घरात प्रवेश झाला असल्यास नियमित चादरी, उशीची अभ्रकं बदला.

इन्सेक्ट रिपलॅन्टचा वापर करा ढेकूणांचं वास्तव्य असू शकेल असा भाग नीट स्वच्छ करा. नवे कपडे, फर्निचर,सोफा घेताना पुरेशी काळजी घ्या. घरात ढेकणांचा प्रवेश होणार नाही याची काळजी घ्या. घरात पुरेशी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. यामुळे आपोआपच ढेकणांचा त्रास कमी करण्यास मदत होते. 

(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)