आता Belly Fat कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्सचा करा वापर

 आजकाल बऱ्या लोकांची समस्या ही बेली फॅट असते. बेली फॅट आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरतं. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करत असाल मात्र त्याचा काहीही फायदा होत नाहीये का? यासाठीच आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्स सांगणार आहोत. 

Updated: Nov 12, 2022, 07:35 PM IST
आता Belly Fat कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्सचा करा वापर title=

Belly Fat : आजकाल बऱ्या लोकांची समस्या ही बेली फॅट असते. बेली फॅट आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरतं. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करत असाल मात्र त्याचा काहीही फायदा होत नाहीये का? यासाठीच आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्स सांगणार आहोत. 

रोज 12 सूर्यनमस्कार करावे

सूर्यनमस्कार हा हार्मोनल बॅलन्स, चयापचय आणि आतड्यांद्वारे पोषक द्रव्यं शोषण्यास मदत करण्यासाठी व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे. हे मानसिक आरोग्य, झोप सुधारण्यास मदत करते. शिवाय यामुळे पोटाची चरबी सहजपणे कमी होते.

इंटरमिटेंट फास्टिंग

इंटरमिटेंट फास्टिंगवेळी तुम्हाला एक फिक्स डाएट फॉलो केलं पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही पुरेश्या प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचं सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होणार नाही. इंटरमिटेंट फास्टिंग लाभदायक ठरू शकतं कारण ते तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत मिळतं.

7-8 तासांची झोप घ्या

तुम्हाला जितकी चांगली झोप मिळेल तितक्या लवकर तुमचं वजन कमी होतं. रात्री 7-8 तासांची शांत झोप घेतल्याने तुमचं लिव्हर डिटॉक्स होतं, हार्मोनल बॅलन्स होतात, वजन कमी होतं, मानसिक आरोग्य सुधारतं आणि शरीर विश्रांतीसाठी योग्य वेळ मिळतो.

कोमट पाणी प्या

कोमट पाणी चयापचय क्रिया सुधारतं, ज्यामुळे केवळ पोटातूनच नाही तर सर्वत्र चरबी कमी होऊ लागते. पोट फुगणं, गॅस, भूक लागणं आणि सतत पोट भरलेलं राहणं यांसारख्या समस्याही यामुळे बऱ्या होतात.