Stale Bread: ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाण्याचे असतात अनेक फायदे

शिळ्या चपाती (Basi Roti) खाल्ल्या पाहिजे की नाही यावर समाजात अनेक समज गैरसमज आहेत. 

Updated: Aug 20, 2022, 09:00 PM IST
Stale Bread: ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाण्याचे असतात अनेक फायदे title=
trending news stale bread benefits do you know the amazing benefits of eating stale chapati in marathi

Stale Bread: गरमा गरम चपात्या खाण्यात जी मजा आहे ती कशात पण नाही. तर दुसरीकडे आपण शिळ्या चपातीचं नाव ऐकलं तरी आपण नाक मुरडतो. शिळ्या चपात्या अनेकांना खायला आवडतं नाही. शिळं अन्न खाणं चांगलं नसतं असं म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याच वेळा शिळं अन्न किंवा शिळ्या चपात्या खाण्याची वेळी घरातील स्त्रीयांवर येते. कारण भारतीय संस्कृतीत अन्नामध्ये देवाचा वास असतो, म्हणून अन्न कधी वाया घालू नये किंवा फेकू नये. 

शिळ्या चपाती (Basi Roti) खाल्ल्या पाहिजे की नाही यावर समाजात अनेक समज गैरसमज आहेत. पण तुम्हाला माहिती आहेत का की, शिळ्या चपात्या खाल्ल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. चला जाणून घेऊयात काय फायदे होतात. (trending news stale bread benefits do you know the amazing benefits of eating stale chapati in marathi)

शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे

पोटाचे दुखणे दूर होते

शिळी चपातीमध्ये  फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाचे आजार दूर होतात. तसंच शिळी चपाती खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही. 

साखर राहते नियंत्रणात

दररोज दुधात मिसळून शिळी चपाती खाल्ल्यास तुमचा रक्तदाब आणिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शिळ्या चपात्यांमध्ये काही बॅक्टेरिया असतात ज्यामुळे ग्लुकोजची पातळी कमी राहण्यास मदत होते. 

शरीराची ताकद वाढते 

दुधात मिसळून शिळी चपाती खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते आणि स्नायू मजबूत होतात. 

शरीराचे तापमान नियंत्रणात राहते

उन्हाळ्यात शिळ्या चपात्या खूप फायदेशीर ठरतात. शिळ्या चपात्यांमध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्याची गुणवत्ता असते. 

उष्माघात नाही

उन्हाळ्याच्या दिवसात शिळ्या चपात्या खाल्ल्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो. 

बीपी नियंत्रणात राहते

रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही शिळी चपाती फायदेशीर आहे. शिळ्या रोट्यामध्ये काही चांगले बॅक्टेरिया येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 

वजन वाढण्यास मदत

दुधासोबत शिळ्या चपात्या खाल्ल्यास दुबळेपणा दूर होतो आणि वजन वाढण्यास मदत होते. 

शिळी भाकरी उर्जेने भरेल

शिळ्या चपात्या सेवन केल्याने भरपूर ऊर्जा मिळते. आळशी व्यक्तीने शिळी चपाती खाल्ल्यास फायदा होतो. 

जीम जाणाऱ्यांसाठी 

तुम्ही जीमला जात असाल तर शिळ्या चपात्या नक्कीच खाव्यात. जीममध्ये स्नायू वाढवणाऱ्यांसाठी शिळ्या चपात्या खूप फायदेशीर आहे.

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)