Trending News : महिलेने पीरियडचं रक्त चेहऱ्यावर लावलं आणि म्हणाली...

What Is Menstrual Cup : सोशल मीडियावर अनेक ट्रेंड पाहिला मिळतात. कधी कुठल्या गाण्यावर रील बनवणं असो किंवा कधी एखाद्या गोष्टीचा हॅश टॅग असो. या वर्षी महिलांमध्ये भलताच ट्रेंड दिसून आला. ज्यात महिला स्वतःचं रक्त चेहऱ्यावर लावतं आहेत. 

Updated: Dec 26, 2022, 08:34 AM IST
Trending News : महिलेने पीरियडचं रक्त चेहऱ्यावर लावलं आणि म्हणाली... title=
Trending News on Social media menstruation masking why suddenly women are applying period blood on their face Video nmp

Woman applying period blood on Face : हे वर्ष 2022 संपायला अवघ्ये 5 दिवस राहिले आहेत. सगळेकडे नवीन वर्षांचं स्वागतासाठी (Happy New Year 2023) जय्यत तयारी सुरु आहे. यावर्षी सोशल मीडियावर अनेक ट्रेंड (trend) पाहिला. त्यातील सगळ्या धक्कादायक आणि भयानक ट्रेंड (Horrible trend) होता तो म्हणजे मुली स्वतःचं रक्त चेहऱ्यावर लावत होत्या. एक महिला प्रत्येक महिन्याला मासिक पाळीचं रक्त (period blood ) आपल्या चेहऱ्याला लावून फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. हा फोटो आणि ट्रेंड सोशल मीडियावर तुफान गाजला. 

कोण होती ही महिला

बार्सिलोनाची (Barcelona) रहिवासी असलेल्या डेरियाने (Deria) हा ट्रेंड सुरू केला. त्यानंतर इतर महिलाही काहीही न समजता त्याचा अवलंब करताना दिसून आल्या. मीडिया इन्फ्लुएंसर डेर्या यांनी दावा केला आहे की अशा प्रकारे चेहऱ्यावर पीरियड ब्लड लावल्याने त्वचा निरोगी राहते. ज्याला डेर्याने मापन मास्किंग असं नाव देण्यात आलं आहे. वोगच्या रिपोर्टनुसार, या ब्युटी हॅकशी संबंधित व्हिडिओंना #moonmasking आणि #menstrualmasking या हॅशटॅगमध्ये सुमारे 6.4 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.

यामागचं सत्य काय आहे ?

डेर्‍या मानतात की पीरियड्सच्या रक्तात घाण नसते. हे रक्त वास्तविक रक्तापेक्षा वेगळे आहे, मुलाच्या जन्माची जबाबदारीही या रक्तावर आहे. कारण या रक्तामध्ये मुलासाठी आवश्यक असलेले सर्व स्टेम पेशी आणि पोषक असतात. डेर्या यांच्या मते, आपल्या त्वचेला आणि शरीरालाही त्याची गरज असते. व्हेरी वेल हेल्थच्या अहवालानुसार, आपल्या नसांमधून जाणारे रक्त आणि मासिक पाळीचे रक्त सारखेच असते. परंतु एंडोमेट्रियमपासून प्राप्त झालेल्या ऊती म्हणजेच गर्भाशयाच्या अस्तर देखील मासिक पाळीच्या रक्तामध्ये आढळतात.

कसा वापर करतात?

जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा कप योनीमध्ये ठेवला जातो. या कपमध्ये ते रक्त जमा होते. हे जमा केलेलं रक्त चेहऱ्याला लावलं जातं. कारण त्यामुळे तुम्ही सुंदर दिसता, असं या महिलांचं म्हणं आहे.  त्यामुळे ब्लड मास्किंगसाठी कप ही पहिली पसंती आहे , कारण या कपांमध्ये रक्त गोळा करणे सोपे आहे. यामुळेच बहुतेक महिला या ब्युटी हॅकसाठी याचा वापर करतात

 तज्ज्ञांचं काय मत?

या विषयावर तज्ज्ञांचं मत, आपल्या नसांमधून जाणारे रक्त आणि पीरियड्सचं रक्त सारखेच असते. परंतु पीरियड्सच्या रक्तामध्ये एंडोमेट्रियमपासून प्राप्त झालेल्या ऊतकांचा समावेश होतो. हे रक्त चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला ते कधीही देणार नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणंय.

त्यांनी रक्त लावले तर? 

या विषयावर तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्यावर पीरियड ब्लडचा वापर केल्यास हानी होऊ शकते. कारण मासिक पाळीच्या रक्तामध्ये गर्भाशयाच्या ऊती आणि बॅक्टेरिया असतात. चेहऱ्यावर हे रक्त वापरणेही हानिकारक ठरू शकतं. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)