मुंबई : भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी महागडी औषधे घेतली जातात. पण तुम्हाला माहित आहे का? मधुमेहावर भेंडी अत्यंत फायदेशीर ठरते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. पहा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी भेंडीचा कसा वापर कराल...
कच्ची भेंडी खाल्याने मधुमेह नियंत्रित राहतो. यातील फायबर्स मधुमेहींसाठी उत्तम मानले जाते. भेंडी घ्या आणि त्याची दोन्ही टोके कापा. त्यातून एक चिकट पदार्थ बाहेर येईल. रात्री झोपण्यापूर्वी भेंडी पाण्याच्या ग्लासात ठेवा आणि त्यावर झाकण ठेवा. सकाळी उठल्यावर पाण्यातून भेंडी बाहेर काढा आणि ते पाणी प्या. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहील. असे नियमित काही महिने करा.