मुंबई : मान्सुनचे आमगन झाले आहे. या आल्हाददायी वातावरणाचा आनंद लुटत असताना त्वचा, केस, आरोग्य यांची काळजी घेणेही महत्त्वाचे ठरते. कारण ऋतुत बदल होताच आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू लागतात. उन्हात घामामुळे भिजणारे केस मान्सुनमध्ये पावसामुळे भिजतात, चिकचिकत होतात. केसांना वेगळाच वास येऊ लागतो. सतत भिजलेल्या केसांमुळे इंफेक्शन होण्याची संभावना असते. कोंड्यासारखी समस्या उद्भवू शकते. म्हणून केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काही खास टिप्स...
# घरातून निघताना ओले केस पूर्णपणे सुकवा. केस खराब होण्यापासून वाचवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
# केसांना डीप कंडीशनिंगची आवश्यकता असते. त्यामुळे तेलाने मालिश केल्यानंतरच केस शॅम्पू, कंडीशनरने धुवा.
# लहानपणापासून आपल्याला पौष्टीक आहार खाण्याचा सल्ला दिला जातो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम केसांवर होतो. त्यामुळे हेल्दी आहार घेऊन केस हेल्दी करा. योग्य आहारामुळे केसांचे फॉलिकल्स मजबूत होतात. यासाठी आहारात सुकामेवा, अंडे, गाजर, हिरव्या पालेभाज्या, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
# नियमित केस धुतल्याने केस व स्काल्फ स्वच्छ राहतात. त्यामुळे इनफेक्शनपासून बचाव होतो.
# ओले केस कधीही बांधू नका किंवा फणीने विंचरु नका. त्यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते.